Shivsena Mahaadhiveshan
Shivsena Mahaadhiveshanesakal

Kolhapur : शिवसेनेच्या महाअधिवेशनात ठाकरे 'लक्ष्य'; उद्धव ठाकरेंनी फसविल्याचा शिंदे गटाच्या नेत्यांचा आरोप

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आमचे ऐकले असते तर महाविकास आघाडी सत्तेत आलीच नसती, असा गौप्यस्फोट केला.
Summary

'१९९२ साली आम्ही तुरुंगात गेलो, त्यावेळी हे संजय राऊत जन्माला आले होते का? शिवसेना आम्ही शिवसैनिकांनी हालअपेष्टा सहन करून वाढविली.'

कोल्हापूर : शिवसेनेच्या महाअधिवेशनात (Shivsena Mahaadhiveshan) आज सर्वच नेत्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांना ‘लक्ष्य’ केले. मंत्री गुलाबराव घोरपडे यांनी ‘आम्ही जेलमध्ये होतो तेव्हा राऊत यांचा जन्म झाला नव्हता,’ अशी टीका केली. तसेच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आमचे ऐकले असते तर महाविकास आघाडी सत्तेत आलीच नसती, असा गौप्यस्फोटही केला.

माजी मंत्री रामदास कदम म्हणाले, ‘उद्धव ठाकरे यांनी एका हॉटेलमध्ये बैठक घेतली. यामध्ये त्यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून घोषित केले. सर्वत्र फटाके उडाले. पण, दुसऱ्या दिवशी स्वतः मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. ठाकरे यांनी शिवसैनिकांची फसवणूक केली.’

Shivsena Mahaadhiveshan
जाधव-राणे समर्थकांत तुफान राडा; पोलिसांकडून अश्रूधुरासह लाठीमार, 400 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल

आता त्यांच्यासाठी आम्ही गद्दार : गुलाबराव पाटील

‘शिवसेना ही चार शब्दांची शिदोरी बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी आम्हाला दिली. या शिदोरीवर आम्ही सर्वसामान्यांचे प्रश्‍‍न सोडविले. संघटना बांधली. काँग्रेसने आमच्यावर किती कलमे लावली याचा हिशोब नाही. १९९२ साली आम्ही तुरुंगात गेलो, त्यावेळी हे संजय राऊत जन्माला आले होते का? शिवसेना आम्ही शिवसैनिकांनी हालअपेष्टा सहन करून वाढविली. बाळासाहेबांनी कोणतेही पद न घेता सर्वसामान्य कार्यकर्त्याला मोठे केले. उद्धव आणि आदित्य यांना ही आपली कंपनी असल्यासारखे वाटते. त्यामुळे आम्ही एकेकाळी फायरब्रँड होतो. आता त्यांच्यासाठी आम्ही गद्दार झालो.’

मुख्यमंत्री शिंदे लाखो मुलींना वडिलांसमान : राजश्री पाटील

‘लातूरमध्ये उच्च शिक्षणाला पैसे नाहीत म्हणून एका मुलीने आत्महत्या केली. एकनाथ शिंदे या बापाच्या मनाला या घटनेची सल लागली. त्यांनी तातडीने उच्च शिक्षण मुलींना मोफत केले. शिंदे यांना मुलगी नाही. पण, या निर्णयाने मुख्यमंत्री शिंदे लाखो मुलींना वडिलांसमान झाले आहेत. महाराष्ट्राच्या गावोगावी विकासगंगा आली आहे. मात्र, सर्वसामान्यांपर्यंत या विकासगंगेचा लाभ पोहोचविणे ही शिवसैनिकांची जबाबदारी आहे. आता मंत्रालयात फेरी मारावी लागत नाही. मंत्रालयच आपल्या दारी आले आहे.’

Shivsena Mahaadhiveshan
Shivsena Mahaadhiveshan : लोकसभेसाठी 'मिशन 48 सक्सेस'; शिवसेनेच्या राष्ट्रीय अधिवेशनात मोठी घोषणा

राज्यात मोठ्या प्रमाणात परदेशी गुंतवणूक : उदय सामंत

‘राज्यात उद्योग आणि व्यापार क्षेत्रात मोठ्या प्रमाणात परदेशी गुंतवणूक झाली आहे. दावोस परिषदेनंतर हजारो कोटींची गुंतवणूक आली आहे. गडचिरोलीसारख्या दुर्गम जिल्ह्यातील एक हजार एकर जमीन उद्योगांसाठी दिली गेली. त्यातून तेथे दीड लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. आता पुढील एका वर्षात उद्योगनगरी अशी गडचिरोली जिल्ह्याची वेगळी ओळख निर्माण होईल. शिवसेनेच्या शिवदुतांपासून मंत्र्यांपर्यंत त्यांच्यावर होणाऱ्या टीकेचे उत्तर देता आले पाहिजे. यासाठी राज्यात किती उद्योग आले, किती बेरोजगारांच्या हाताला काम मिळणार? या सर्वांची माहिती आज अधिवेशनातील दुसऱ्या सत्रांत दिली गेली. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या काळात शिवदुतालाही विरोधकांचे मुद्दे खोडून काढता येतील.’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com