हवा करवीरची

हवा करवीरची

लोगो ः हवा करवीरची...

थांबा... मी आधी बोलणार !
नेते म्हटले की, तेच प्रत्येक ठिकाणी प्रमुख पाहुणे, प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित. त्यामुळे त्यांचे पाठोपाठ कार्यक्रम असतातच. एका कार्यक्रमाला वेळ झाला की पुढच्या कार्यक्रमाला पोहचण्यासाठी त्यांची चुळबूळ सुरू होतेच. पण, ती चुळबूळ कार्यक्रमासाठी आलेल्या प्रेक्षकांच्या नजरेत भरतेच. असाच एक किस्सा नुकताच न्यू कॉलेजच्या नव्या इमारतीच्या भूमिपूजन समारंभात घडला. पालकमंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील प्रमुख उपस्थित, अध्यक्षस्थानी मालोजीराजे होते. तिघांनाही छत्रपती शाहू स्टेडियमवरील फुटबॉल स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी जायचं होतं. त्यामुळे तिघांचीही समारंभात लवकर बोलण्याची घाई सुरू झाली. मंत्री चंद्रकांत पाटील माईकजवळ जाताच, ‘थांबा.. मी आधी बोलणार’ असे म्हणत मालोजीराजेही खुर्चीवरून उठले. त्यावर मंत्री पाटील यांनी नेहमीप्रमाणे हसतच व तोंडातल्या तोंडात बोलण्याच्या अनोख्या स्टाईलमध्ये, ‘तुम्ही अध्यक्षस्थानी आहात’ असे उत्तर दिलं अन् थेट बोलायला सुरुवात केली. त्यामुळे प्रमुख पाहुण्यांची ही घाई पाहून उपस्थितांमध्ये एकच हास्य फुलले.

( नेते एका पाठोपाठ पळताना क्लीपआर्ट वापरावे)
-------------------
आता सुटी नाय...
कोल्हापुरात कोणतीही फुटबॉल स्पर्धा असो, त्यात निवेदक म्हणून ‘विजय’ हवाच. हा कोल्हापूरकरांच्या फुटबॉल रसिकांचा अट्टाहास कायम असतो. मैदानावरील किस्से अन् उत्कृष्ट खेळीचे तितकेच बहरदार निवेदन अशी त्याची ख्याती सर्वश्रृत आहे. त्याच्या प्रत्येक वाक्यावर रसिकांचे मनोरंजन ठरलेलं असतंच. सामन्याचे वर्णन करण्याची त्याची विशिष्ट शैली रसिकांच्या मनात चांगलीच घर करून बसली आहे. त्याच्या शैलीवर खूश होऊन के.एम. चषक स्पर्धेत संयोजकांनी त्याला दहा हजार रुपयांचे बक्षीस देऊन सन्मानित केले. त्यावर विजयनेही ‘आता सुटी नाय’ असे उत्तर दिलं. हे त्याचे उत्तर उपस्थितांनी सलग फुटबॉल स्पर्धा आहेत. त्यामुळे ‘आता सुटी नाय’ असे म्हटले की, उपस्थित नेत्यांना निवडणुकांमध्ये ‘आता सुटी नाय’ असे सुचविले. त्याच्या या दुहेरी अर्थाने केलेल्या वाक्यावर फुटबॉल सामन्यानंतर चर्चेला ऊत आला.

( माईकवर बोलताना एकादा गमतीदार, फुटबॉलसह वापरावे)
-------------------
अहो, ते मिलिंद नव्हे राहुल ओ...

व्यासपीठावरून बोलताना अनेकांना भानच राहात नाही. त्यात एखाद्यावर भरभरून तोंड सुख घेताना अनेकांची जीभच घसरते. त्यात बोलण्याच्या ओघात आपण काय बोलतो, याचाही त्यांना विसर पडलेला असतो. त्यावेळी अशा नेत्यांना प्रेक्षकांतून अगर व्यासपीठावरून सूचना देत भानावर आणावे लागते. अशावेळी फुकटचं हसं करून घ्यावं लागतं. चार दिवसांपूर्वी एका सभागृहात अशाच पद्धतीने हातात ‘मशाल’ धारण करत राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. पश्‍चिम भागाच्या एका माजी आमदारांना भाषणात चेव चढला. आपल्या भाषणात पक्षाच्या चिन्हाबाबत निकाल निर्णय देणाऱ्या नार्वेकरांचा समाचार घेतला. ते बोलताना गडबडले अन् मिलिंद नार्वेकर यांनी चुकीचा निर्णय दिल्याचे म्हणताच, उपस्थितांनी अहो ‘मिलिंद नव्हे राहुल ओ’, अशी ओरडून कोपरखळी मारली. यावर माजी आमदारांना आपली चूक लक्षात येताच त्यांनी ती दुरुस्त करून ‘सॉरी... राहुल असा उल्लेख केल्याने उपस्थितांचा जीव भांड्यात पडला. कारण मिलिंद हे त्यांच्याच पक्षाचे आणि पक्षप्रमुखांच्या जवळचे असल्याने त्यांचे नाव घेतल्याची चर्चा या ठिकाणी रंगली.

(सभागृहात बसलेले डोक्यावर हात मारून घेताना कार्यकर्ते अगर समोर हातवारे करून पाहाताना क्लीपअर्ट वापरावे)
---- -----
आले, दोन-चार भाषणं झाडली अन् गेलेही
धगधगत्या ‘मशाली’च्या राजकीय पक्षाच्या बैठकीत एका पदाधिकाऱ्याने पक्ष सोडून गेलेल्या खासदारांचा चांगलाच समाचार घेतला. गेल्या निवडणुकीत ते पक्षात आले काय? दोन-तीन भाषणे झाडली काय? आणि दुसऱ्या पक्षात गेले काय, असा टोला लगावला. या खासदारांविरोधात आता जो कोणी उमेदवार असेल त्याला लिडने निवडून आणून त्यांना जागा दाखवूया, असे म्हणताच उपस्थितांमधून ‘व्हय, आता ते काय परत निवडून येत नाहीत, त्यांची शेवटचीच निवडणूक’ अशी कुजबुज कानावर आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com