रिसर्च स्टोरी

रिसर्च स्टोरी

लोगो ः रिसर्च स्टोरी 
केशकर्तनालयांची तीन कोटींवर उलाढाल
एकेकाळची बलुतेदारी पद्धतीतील सेवा बनली इंडस्ट्री

सुयोग घाटगे : सकाळ वृत्तसेवा 
कोल्हापूर, ता. १० : कोल्हापूरची पुरुष व महिला अशी दोन्ही मिळून केश कर्तनालयांची एकत्रित उलाढाल महिन्याला तीन कोटींवर गेली आहे. एकेकाळी बलुतेदारी पद्धतीतून चालणारी ही सेवा आज कोट्यवधींची उलाढाल असणारी इंडस्ट्री बनली आहे.  
मानवी सौंदर्यामध्ये केशरचनेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. यामुळेच यामध्ये विविध प्रयोग होऊन नवनवीन हेअरस्टाईल निर्माण झाल्या. बीटल्स, बॉबकटपासून अल्पिन कटपर्यंत सर्व सुविधा एकाच छताखाली मिळणारी ठिकाणे सध्या चलतीत आहेत. जिल्ह्यात सध्या ४ हजार ५०० केशकर्तनालये, तर ४ हजार लेडीज पार्लर आहेत. यातील शहरातच ९६५ केशकर्तनालये, तर ९०० लेडीज पार्लर आहेत. ५० रुपयांपासून अगदी ७०० रुपयांपर्यंत हेअर कटसाठी आकारले जातात. यातूनच हा व्यवसाय म्हणून किती वाढत आहे, हे लक्षात येते.    
अनेक नवनवीन केशरचना सध्या चलतीत आहेत. यामध्ये प्रामुख्याने क्लासिक क्रू कट, फेड हेअर कट, पोम्पाडोर, क्विफ, अंडरकट यांचा समावेश होतो, तर महिलांमध्ये अनेक केशरचना व्यक्तिसापेक्ष व केसांचा पोत यावर अवलंबून असतात. सर्वसाधारण सरळ, दाट, कुरळे, विरळ, मध्यम अशा केश पद्धतीमुळे त्यांची ठेवण बदलते. लॉब, लेयर्स, पिक्सी कट, वेव्ह या चलतीत असणाऱ्या केशरचना आहेत. यासह सुंदरता वाढीसाठी विविध सेवा उपलब्ध आहेत. यासाठी ३० रुपयांपासून २० हजार रुपयांपर्यंत दर आकारले जातात.
फॅमिली सलून ही नव्याने उदयास येत असलेली संकल्पना कोल्हापूरमध्येही रुजू लागली आहे. एका कुटुंबामध्ये असणाऱ्या सर्व वयोगटातील सदस्यांसाठी एकाच छताखालील आवश्यक असणाऱ्या सुविधा देण्यात येतात. या रचनेमुळे कुटुंबातील सदस्यांचा वेळ वाचत असून, एकाच वेळेत विनादिक्कत काम पूर्णत्वास येत आहे.

कोट
या इंडस्ट्रीत सेवा खूप महत्त्वाचा घटक आहे. प्रत्येकाच्या प्रकृती व ठेवण लक्षात घेऊन काम करावे लागते. काम करताना चुकीला संधी नसते. यामुळे योग्य प्रशिक्षण व उत्पादनाचे ज्ञान वेळोवेळी आत्मसात करणे गरजेचे आहे.
- सयाजी झुंजार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com