तरूणावर तलवार हल्ला

तरूणावर तलवार हल्ला

हॉर्न वाजवल्याच्या रागातून
तरुणावर तलवार हल्ला
कोल्हापूर, ता. १०ः साने गुरुजी वसाहत परिसरात हॉर्न वाजवल्याच्या रागातून तरुणावर तलवार हल्ला करण्यात आला. आरबाज आशपाक अत्तार (वय २६, रा. साने गुरुजी वसाहत) असे जखमीचे नाव आहे. हाताला गंभीर दुखापत झाल्याने जखमीवर रात्री तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी, आरबाज शनिवारी रात्री त्याच्या दुचाकीवरून घरी चालला होता. बाजूने मोटारीतून निघालेल्या तरुणांना त्याने हॉर्न दिला. हॉर्न वाजविल्याच्या रागातून मोटारीतील तरुणांनी पुढे जाऊन आरबाजला अडवून शिवीगाळ केली. आरबाजनेही प्रत्युत्तर दिल्याच्या रागातून मोटारीतील तरुणांनी खाली उतरून त्याला बेदम मारहाण सुरू केली. मोटारीत असलेल्या तलवारीने आरबाजवर वार केल्याने तो कोसळला. त्याला जखमी अवस्थेत टाकून मोटारीसह संशयित पसार झाले.
...
वाढदिवसाचा केक तलवारीने
कापण्याची खुमखुमी
मोटारीतील तरुणांकडे तलवार होती. सर्वजण केक व तलवार घेऊन वाढदिवस साजरा करण्याच्या उद्देशाने चालले होते. हीच तलवार आरबाजवर हल्ल्यासाठी वापरण्यात आल्याचे त्याच्या मित्रांनी सांगितले. केक कापण्यासाठी तलवार वापरण्यामागे दहशत निर्माण करण्याचा हेतू दिसून येतो. जुना राजवाडा पोलिस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com