समतावादी चळवळ कार्यक्रम

समतावादी चळवळ कार्यक्रम

70372
कोल्हापूर : शाहू स्मारक भवनमध्ये आम्ही भारतीय महिला मंचतर्फे संवाद गोलमेज परिषदेत भेदावर आधारित निर्माण केलेली जात आणि वर्णाची उतरंड फोडून परिषदेचे उद्‌घाटन करताना उपस्थित महिला.

समतावादी स्त्री-पुरुषांची स्वाभिमानी
चळवळ उभी राहावी : ॲड. विमल

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १० : ‘भारत हा संविधानावर चालणारा देश असून या संविधानाने स्त्री आणि पुरुषांना समान अधिकार दिलेले आहेत. आज काही पक्ष, संघटना व लोक स्त्री व पुरुषांमध्ये भेदभावाचे राजकारण करून त्यांच्यातील भेदाची दरी वाढवत आहेत. अशा काळात समतावादी स्त्री-पुरुषांची स्वाभिमानी चळवळ उभी राहिली पाहिजे,’ असे मत गोलमेज परिषदेच्या अध्यक्ष ॲड. करुणा विमल यांनी व्यक्त केले.
‘आम्ही भारतीय महिला मंच’ आयोजित समतावादी निवडक स्त्री-पुरुषांच्या संवाद गोलमेज परिषदेत त्या बोलत होत्या. शाहू स्मारक भवन येथे कार्यक्रम झाला. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आणि अतिशूद्र स्त्रिया अशी भेदावर आधारित निर्माण केलेली जात आणि वर्णाची उतरंड फोडून परिषदेचे उद्‌घाटन झाले.
परिषदेत निलोफर मुजावर, स्वाती कृष्णात, सीमा पाटील, प्रा. टी. के. सरगर, रूपाताई वायदंडे यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. अनिल कवठेकर, राजेंद्र नाईक, मोहन मिणचेकर, डॉ. सुजाता माने, रेश्मा खाडे, जयश्री नलावडे, विमल पोखरणीकर, मंगल समुद्रे, नीती उराडे, डॉ. निकिता चांडक, लता पुजारी, वृषाली कवठेकर यांच्यासह महाराष्ट्रातील विविध सामाजिक चळवळीमध्ये कार्यरत असणारे निवडक स्त्री-पुरुष सहभागी झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com