शिवाजी तरुण मंडळ उपांत्य फेरीत

शिवाजी तरुण मंडळ उपांत्य फेरीत

फोटो आहे...
.......................

लोगो ः सतेज चषक फुटबॉल स्पर्धा
................
शिवाजी तरुण मंडळ उपांत्य फेरीत

अटीतटीच्या सामन्यात संध्यामठ तरुण मंडळावर एकतर्फी विजय

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १० : शिवाजी तरुण मंडळाने संध्यामठ तरुण मंडळावर एक विरुद्ध शून्य गोल फरकाने विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. पाटाकडील तालीम मंडळ
आयोजित सतेज चषक फुटबॉल स्पर्धेतील सामना छत्रपती शाहू स्टेडियमवर झाला.
शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध संध्यामठ तरुण मंडळ यांच्यातील सामना अटीतटीचा झाला. सामन्यात शिवाजी तरुण मंडळाने एक विरुद्ध शून्य गोल फरकाने विजय मिळवला. संध्यामठ संघाने आक्रमक खेळ करत शिवाजी तरुण मंडळाच्या बचाव फळीवर दबाव निर्माण केला. दरम्यान, त्यांनी केलेल्या आक्रमणाचे रूपांतर गोलमध्ये झाले नाही. तर शिवाजी मंडळाकडून काही आक्रमक चढाया झाल्या. यामध्ये संदेश कासार, राजा अली, इंद्रजित चौगले, एडविन यांनी चांगला खेळ केला. पूर्वार्धाच्या अधिकच्या वेळेत निर्माण झालेल्या संधीचा फायदा घेत शिवाजी मंडळाच्या संकेत साळुंखेने गोल नोंदवत संघाला एक गोलने आघाडी मिळवून दिली. उत्तरार्धात संध्यामठकडून अधिक आक्रमक खेळ झाला. यामध्ये यश जांभळे, हर्षद जरग, चंदन गवळी, हृषिकेश तांबे यांनी सूत्रबद्ध खेळ करत गोलसाठी प्रयत्न केले. मात्र, त्यांना त्यात यश आले नाही. अखेरपर्यंत हा सामना एक विरुद्ध शून्य असाच राहिला. सामन्यात विजय मिळवत शिवाजी तरुण मंडळाने उपांत्य फेरीत प्रवेश केला.
.....
चौकट..
दोन्ही संघात वाद, धक्काबुक्की
सामन्याच्या उत्तरार्धात अखेरची काही मिनिटे शिल्लक असताना दोन्ही संघांमध्ये वाद व धक्काबुक्की झाली. यामुळे दोन्ही संघांतील प्रशिक्षक, संघ व्यवस्थापक यांच्यासह राखीव खेळाडूंनाही मैदानात येऊन परिस्थिती नियंत्रणात आणावी लागली.
....
चौकट...
समर्थकांत हाणामारी
खेळाडूंमधील झालेल्या वादाचे पडसाद प्रेक्षक गॅलरीमध्ये उमटले. प्रेक्षक गॅलरीमध्ये असणाऱ्या दोन्ही बाजूच्या समर्थकांमध्ये वादावादी होऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. अखेर प्रेक्षकांना शांत करण्यासाठी दोन्ही संघांतील खेळाडू प्रेक्षक गॅलरीजवळ जाऊन शांततेचे आवाहन करू लागले.
....
चौकट
दोघांना रेड कार्ड
मैदानावर अखिलाडूवृत्ती दाखवविबद्दल शिवाजी तरुण मंडळाचा खेळाडू रोहन आडनाईक याला दोन यलो असे रेड कार्ड दाखविण्यात आले, तर सामन्यादरम्यान शिवीगाळ केल्याबद्दल संध्यामठ तरुण मंडळाचा खेळाडू कपिल शिंदे याला रेड कार्ड दाखविण्यात आले.
.....
सामनावीर
योगेश कदम (शिवाजी तरुण मंडळ)

लढवय्या खेळाडू
आशीष पाटील (संध्यामठ तरुण मंडळ)

आजचा सामना
सायंकाळी ४ वा. : दिलबहार तालीम मंडळ विरुद्ध बालगोपाल तालीम मंडळ
.............

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com