आजरा ः भाजप पदाधिकारी मेळावा

आजरा ः भाजप पदाधिकारी मेळावा

संजय मंडलिक यांना
मताधिक्य देणार ः चराटी

आजऱ्यात भाजप पदाधिकाऱ्यांचा मेळावा

सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. ३ ः गत दहा वर्षांत भारत देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासात्मक काम केले. त्यामुळे देश प्रगतीचे विविध टप्पे पार करीत आहे. मोदींना पुन्हा एकदा निवडून आणून देशाचे पंतप्रधान बनवण्यासाठी आपण खारीचा वाटा उचलावा. यासाठी महायुतीचे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार संजय मंडलिक यांना तालुक्यातून मताधिक्य देणार आहे, असे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक चराटी यांनी सांगितले.
येथे भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला. श्री. चराटी अध्यक्षस्थानी होते. वीरेंद्र मंडलिक प्रमुख उपस्थित होते. वीरेंद्र मंडलिक म्हणाले, ‘मतदारसंघाच्या विकासासाठी खासदार मंडलिक यांनी सातत्याने काम केले आहे. देशाच्या प्रगतीसाठी व पंतप्रधान मोदींना बळ देण्यासाठी खासदार मंडलिक यांना पुन्हा निवडून द्यावे.’
आजरा बँकेचे अध्यक्ष रमेश कुरुणकर, भाजपचे आजरा तालुका अध्यक्ष अनिरुद्ध केसरकर, विलास नाईक, डॉ. अनिल देशपांडे, डॉ. दीपक सातोसकर, विजयकुमार पाटील, दशरथ अमृते, जी. एम. पाटील, जयवंत सुतार, निवृत्ती शेंडे, अतिशकुमार देसाई, संदीप पाटील आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com