जनता गृहतारण संस्थेला ४३ लाखांवर नफा ः मोरे

जनता गृहतारण संस्थेला ४३ लाखांवर नफा ः मोरे

जनता गृहतारण संस्थेला
४३ लाखांवर नफा ः मोरे
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. ४ ः सभासद, कर्जदार व ठेवीदारांशी विश्वासाचे नाते जपल्यामुळे गत आर्थिक वर्षात संस्थेने २४३ कोटींची उलाढाल केली आहे. यामध्ये संस्थेला ४३ लाख ५७ हजार ९२३ रुपये इतका निव्वळ नफा झाला आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष मारुती मोरे यांनी दिली आहे.
संस्थेकडे ८२ कोटी ८४ लाख १८ हजारांच्या ठेवी आहेत. ५८ कोटी ४१ लाख ६४ हजार रुपये कर्जाचे वाटप केले आहे. संस्थेचे खेळते भांडवल ११९ कोटींचे असून, २६ कोटी ३३ लाख ३४ हजारांची गुंतवणूक केली आहे. गडहिंग्लज व कोल्हापूर येथे स्वमालकीच्या इमारती आहेत. संस्थेने ग्राहकांना घरपोच सेवा दिली आहे. गृहकर्जासाठी १ कोटीपर्यंत व प्लॉट खरेदीसाठी ७५ लाख रुपये कर्ज दिले जाते. सोने तारणासाठी कर्जपुरवठा केला जातो, असे सांगितले. उपाध्यक्ष गणपतराव अरळगुंडकर, संचालक डॉ. अशोक सादळे, प्रा. डॉ. अशोक बाचुळकर, प्रा. विनायक चव्हाण, प्रा. बळवंत कडवाले, प्रा. मनोज देसाई, अॅड. सुभाष डोंगरे, प्रा. डॉ. तानाजी कावळे आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com