अग्रीम रक्कमेबाबत आयुक्तांना निवेदन

अग्रीम रक्कमेबाबत आयुक्तांना निवेदन

अग्रिम रकमेबाबत आयुक्तांना निवेदन
इचलकरंजी, ता. ४ ः महापालिका कर्मचाऱ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व रमजान ईदपूर्वी १२,५०० रुपये इतकी अग्रिम रक्कम मंजूर करावी, अशी मागणी सर्व कामगार संघटना कृती समितीने केली आहे. याबाबतचे निवेदन आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांना दिले आहे. मार्चचा पगार त्वरित करावा, शासन निर्णयाप्रमाणे सातवा वेतन आयोग फरकाचा चौथा व पाचवा हप्ता मिळावा, महागाई भत्ता त्वरित मिळावा, अशा मागण्याही निवेदनात केल्या आहेत. अध्यक्ष अण्णासाहेब कागले व सरचिटणीस के. के. कांबळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने हे निवेदन सादर केले.
------------

इचलकरंजीत महापालिका उपायुक्तांना जबाबदारीचे वाटप

इचलकरंजी, ता. १४ ः महापालिकेकडे दोन नवीन उपायुक्तांची शासनाकडून नुकतीच नियुक्ती झाली आहे. त्यामुळे विविध विभागांच्या जबाबदारीचे वाटप नव्याने केले आहे. उपायुक्त प्रसाद काटकर यांच्यावर मुख्यालयाची जबाबदारी दिली आहे. त्यांच्या नियंत्रणाखाली १३ विभाग असणार आहेत. उपायुक्त स्मृती पाटील यांच्याकडे १० तर उपायुक्त सोमनाथ आढाव यांच्याकडे ११ विभागांची जबाबदारी सोपवली आहे. प्रभारी सहाय्यक आयुक्त केतन गुजर यांच्याकडे पाच विभाग आहेत.
नव्याने नियुक्त झालेले काटकर यांच्याकडे आस्थापना व सामान्य प्रशासन, कामगार कल्याण, नगरसचिव, बांधकाम, विद्युत, नगररचना, अतिक्रमण, मालमत्ता व्यवस्थापन, मार्केट, परवाना, निवडणूक, आवक-जावक, प्रभाग समिती कार्यालय (अ, ब) असे विभाग राहणार आहेत. स्मृती पाटील यांच्याकडे घनकचरा व्यवस्थापन, रुग्णालय, जन्म - मृत्यू व विवाह नोंदणी, महिला व बालकल्याण, दिव्यांग कल्याण, ग्रंथालय, विधी, पशुशल्य चिकित्सा असा विभागांची जबाबदारी सोपवली आहे.
आढाव यांच्याकडे यापूर्वी असलेल्या काही विभाग बदलले आहेत. आता त्यांचे पाणीपुरवठा, पर्यावरण, उद्यान, लेखापरीक्षण, कर मूल्यांकन व संकलन, माहिती व तंत्रज्ञान, मध्यवर्ती भांडार, माहिती व जनसंपर्क, प्रभाग समिती कार्यालय (क, ड) या विभागावर नियंत्रण राहणार आहे. गुजर यांच्याकडे अभिलेख, वाहन, अग्निशमन, अतिक्रमण, सुरक्षा या विभागाचे काम सोपवले आहे. आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी याबाबतचा आदेश दिला आहे. यामुळे कामकाजात सूसुत्रता व गती येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com