छत्रपती शाहू महाराज चषकाचा सिंधुदुर्ग स्पोर्टस् क्लब मानकरी

छत्रपती शाहू महाराज चषकाचा सिंधुदुर्ग स्पोर्टस् क्लब मानकरी

14735
कोल्हापूर : परिवहन कल्चरल स्पोर्टस् फाऊंडेशनतर्फे आयोजित छत्रपती शाहू महाराज चषक-२०२४ लेदर बॅाल क्रिकेट स्पर्धेतील विजेत्या सिंधुदुर्ग स्पोर्टस् क्लबला चषक देताना यशराज छत्रपती. शेजारी डावीकडून मधू बामणे, प्रकाश तारळेकर, कमलाकर रोटे, अनिल शिंदे.
...............
लोगो ः निमंत्रितांची लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा

छत्रपती शाहू महाराज चषकाचा
सिंधुदुर्ग स्पोर्टस् क्लब मानकरी

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ४ : निमंत्रितांच्या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत सिंधुदुर्ग स्पोर्टस् क्लबने येथील शिवनेरी स्पोर्टसवर मात करत छत्रपती शाहू महाराज चषक पटकावला. स्पर्धा परिवहन कल्चरल स्पोर्टस् फाऊंडेशनतर्फे शास्त्रीनगर मैदानावर झाली.
‘सिंधुदुर्ग’ने पहिल्या डावात सर्व गडी गमावून १३३ धावा केल्या. त्यांच्या सर्वेश सावंतने सर्वाधिक ३६, तर नीलेश काळेने ३० धावा केल्या. ‘शिवनेरी’कडून श्रीराज चव्हाण, श्रेयस पाटील यांनी प्रत्येकी चार गडी बाद केले. ‘शिवनेरी’ने सर्व गडी गमावून १३५ धावा केल्या. त्यांच्या श्रेयस पाटीलने ३०, प्रथमेश पाटील व अथर्व कोडोलीकर यांनी प्रत्येकी २२ धावा केल्या. ‘सिंधुदुर्ग’कडून नीलेश काळेने चार गडी बाद केले. दुसऱ्या डावात सिंधुदुर्गने सात गडी गमावून १७३ धावा फटकावल्या. त्यांच्या साहील पाटीलने ३०, तर महेश शिप्परकर व नीलेश काळे यांनी प्रत्येकी २४ धावा केल्या. ‘शिवनेरी’कडून श्रीराज चव्हाणने तीन, तर सोहम काटकरने दोन गडी बाद केले.
‘शिवनेरी’ला दुसऱ्या डावात सर्व गडी गमावून १०८ धावा करता आल्या. त्यांच्या अथर्व चंदुरेने २३, साहील शिब्बेने २३, विशाल पाटीलने २१ धावा केल्या. ‘सिंधुदुर्ग’कडून प्रथमेश चिंदूरकरने चार गडी बाद केले. यशराज छत्रपती यांच्या हस्ते विजेत्या ‘सिंधुदुर्ग’ व उपविजेत्या ‘शिवनेरी’ला चषक देण्यात आला.
...........
मालिकावीर
निलेश काळे (सिंधुदुर्ग स्पोर्टस क्लब)

उत्कृष्ट फलंदाज
महेश शिप्परकर (सिंधुदुर्ग स्पोर्टस् क्लब)

उत्कृष्ट गोलंदाज
नीलेश काळे (सिंधुदुर्ग स्पोर्टस क्लब)
............

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com