यिन आरोग्य शिबिर

यिन आरोग्य शिबिर

फोटो - ७९६५१

यिन लोगो

यात्रा जोतिबाची आरोग्य सेवा भाविकांची...!

३ हजार ६७४ भाविकांवर उपचार; अशोकराव माने फार्मास्युटिकलच्या विद्यार्थ्यांचा सहभाग

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २५ : रणरणत्या उन्हात जोतिबाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी ‘यिन’ची तरुणाई सरसावली. भाविकांना वैद्यकीय सेवा कशी तत्परतेने देता येते, याचा दाखलाच त्यांनी दिला. अगदी लहान मुला-मुलींपासून ते ज्येष्ठ नागरिक अशा एकूण ३ हजार ६७४ भाविकांवर त्यांनी उपचार केले.
‘सकाळ’च्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन) राष्ट्रीय सेवा योजना विभागांतर्गत जोतिबा चैत्र यात्रेनिमित्त मोफत आरोग्य सेवा शिबिर झाले. अशोकराव माने इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस अँड रिसर्च (सावे) व व्हाईट आर्मी (कोल्हापूर) यांच्या संयुक्त विद्यमाने त्याचे आयोजन केले होते.
जोतिबा यात्रेकरिता दरवर्षी लाखो भाविक डोंगरावर दाखल होतात. मानाच्या सासनकाठ्या नाचवत येत असताना, त्यांच्या पायाला जखमा होतात. काहींना उन्हाचा तडाखा सहन होत नाही. रक्तदाब वाढून काहींना चक्कर येते. अशा रुग्णांवर उपचार करण्यासाठी ‘यिन’ची तरुणाई कार्यरत होती. जोतिबा मंदिर, यमाई मंदिर, एस. टी. स्टँड, सेंटर प्लाझा या ठिकाणी वैद्यकीय कक्ष उभारले होते. रक्तदाब, मधुमेहची तपासणी येथे करण्यात येत होती. पाच गंभीर रुग्णांवर प्राथमिक उपचार करून त्यांना सीपीआर रुग्णालयात दाखल केले. अशोकराव माने इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस अँड रिसर्चमधील द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला.
प्राचार्य डॉ. अभिजित कुलकर्णी, कॉलेज ‘यिन’ समन्वयक प्रा. अनिल पाटील, प्रा. सूरज जाधव, ‘यिन’ सहायक व्यवस्थापक अवधूत गायकवाड, ‘यिन’ अध्यक्ष प्रतीक लिमकर, उपाध्यक्ष ओंकार हसीलकर, सूरज गिज्जे यांनी संयोजन केले. केएमएचे अध्यक्ष डॉ. अमोल कोडोलीकर, जीपीएचे अध्यक्ष डॉ. अरुण धुमाळ, सचिव डॉ. महादेव जोगदंडे, केडीजीपीएचे अध्यक्ष डॉ. सरदार पाटील, डॉ. बद्रुद्दीन मणेर, ‘निहा’चे अध्यक्ष डॉ. शीतल पाटील, डॉ. चेतन गुरव, अशोक रोकडे यांनी सहकार्य केले.
...........................

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com