एटीएमची आदलाबदल करून दीड लाखाला गंडा

एटीएमची आदलाबदल करून दीड लाखाला गंडा

एटीएम कार्डची आदलाबदल
करून दीड लाखाला गंडा

असेम्ब्ली रोडवरील प्रकार ः फिर्यादीने संशयिताला स्वतःच पकडले

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २५ : एटीएममधून पैसे काढण्यास मदत करण्याच्या बहाण्याने भामट्याने वन विभागाच्या कर्मचाऱ्याच्या कार्डची आदलाबदल केली. वेगवेगळ्या एटीएम सेंटरमधून दीड लाखाची रक्कम परस्पर काढली. संबंधित वन खात्याच्या कर्मचाऱ्याने मित्रांच्या मदतीने या भामट्याचा माग काढला. दोन दिवसांनी कागलमध्ये त्याला पकडून नंतर शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात दिले. सोनुकुमार पंचानंद सनगही (वय २८, रा. अमरपूर, जि. भागलपूर, बिहार) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.
फिर्यादी भिवाजी देवणे हे वन खात्यात नोकरीस आहेत. सोमवारी (ता. २२) ते असेम्ब्ली रोडवरील ट्रेझरीच्या एटीएम सेंटरमध्ये गेले होते. या ठिकाणी दोन तरुण बाहेर थांबले होते. एक मशीन बंद असल्याचे सांगून त्यापैकी एकजण देवणे यांना मदत करण्याच्या बहाण्याने पुढे आला. यावेळी देवणे यांची नजर चुकवून त्याने एटीएम कार्डची अदलाबदल केली.

खात्यावरील पैसे गायब
देवणे यांच्या खात्यावरील पैसे कमी झाल्याचा संशय आल्याने त्यांनी बॅंकेत जाऊन पासबुक भरले असता, वेगवेगळ्या ठिकाणांहून पैसे काढण्यात आल्याचे समजले. तसेच त्यांच्या कार्डचा वापर करून ऑनलाईन वस्तू खरेदी केल्याचे समोर आले. त्यांनी स्वतःजवळील कार्ड बॅंकेत दाखवले. मात्र, हे कार्ड वेगळेच असल्याचे निदर्शनास आले.

कागलमध्ये जाऊन भामट्याला पकडले
घडलेल्या प्रकाराची माहिती देवणे यांनी मित्रांना दिली. तसेच चोरट्याच्या वर्णनावरून त्याचा शोधही सुरू केला होता. संशयित भामटा बुधवारी कागल येथे आल्याची माहिती देवणे यांच्या एका मित्राने दिली. त्यांनी तत्काळ त्या ठिकाणी जाऊन भामट्याची अंगझडती घेतली असता त्याच्या खिशात एटीएम कार्ड मिळून आले. संशयिताला पकडून शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com