लोक मोर्चा सभा

लोक मोर्चा सभा

संविधानविरोधी सरकारला सत्तेतून खाली खेचा
तीस्ता सेतलवाड; भारतीय लोकमोर्चातर्फे निर्धार सभा

कोल्हापूर, ता. २५ ः ‘गोरगरिबांना सक्षमपणे जगण्याचे अधिकार संविधानाने दिले तेच अधिकार काढून घेऊन कार्पोरेट जगताच्या भले करणाऱ्या मोदी सरकारला सत्तेतून खाली खेचावे. त्यासाठी मोठ्या संख्येने संविधान रक्षण करणाऱ्यांना मतदान करा, संविधानविरोधी सत्ताधारी सरकारला घरी घालवल्याशिवाय देशाला स्वास्थ लाभणार नाही,’’ असे आवाहन व्होट फॉर डेमोक्रॉसीच्या संस्थापक तीस्ता सेतलवाड यांनी आज येथे केले.
महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्यासाठी भारतीय लोकमोर्चातर्फे घेण्यात आलेल्या निर्धार सभेत त्या बोलत होत्या.
सेतलवाड म्हणाल्या, ‘देशाच्या इतिहासात संविधानाला सर्वाधिक धक्के देणारे भाजप सरकार दिल्लीत सत्तेत आहे. ते सरकार संविधानविरोधी आहे. दलित, आदिवासी, मुस्‍लिमांना ते शत्रू समान मानतात. कार्पोरेट उद्योगाला सवलतींची खैरात करून त्यांना उभारी मिळेल, अशी धोरणे राबवतात. या उलट शेतकरी, कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करतात. शेतकऱ्यांचे आंदोलन दीर्घकाळ चालले, कामगारांचे आंदोलनेही तीव्रतेने झाली तरीही सरकारने त्यांची दखल फारशा गांभीर्याने घेतलेली नाही.’
हिंदी है हम हिंदोस्ताचे नेते हुमायूम मरसूल म्हणाले, ‘शेतकरी, कामगार कष्‍टकऱ्यांनी हक्कासाठी आंदोलन केले तर त्यांना ते तुरुंगात घालत आहेत. अनेकांना देशद्रोही ठरविण्याचा प्रयत्न करतात. लोकशाहीला धोका पोहचविणारे कायदे करण्यात व कष्‍टकऱ्यांच्‍या हिताचे कायदे बदलण्यात जे सरकार जास्त आग्रही भूमिका घेते असे सरकार यंदा लोकसभा निवडणुकीत पराभूत व्हावे. यादेशात विविध जाती धर्माचे लोक हजारो वर्ष गुण्यागोविंदाने एकत्र राहिले. त्यांच्यात टोकाचा भेद निर्माण होत आहे तो दूर व्हावा, सर्वजण पुन्हा गुण्या गोविंदाने एकत्र राहावेत, अशी भूमिका घेणाऱ्या मित्र पक्ष सत्तेत यावेत.’ संपत देसाई, दादा गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com