आवश्यक बातम्या

आवश्यक बातम्या

लोगो- सांस्कृतिक कोल्हापूर

79874
कोल्हापूर : ‘सहस्त्र गणपती सहस्त्र कथा‘ पुस्तकाचे प्रकाशन डॉ. अमर अडके, उमाकांत राणिंगा यांच्या हस्ते झाले.

‘गाणारे दगड बोलणारे पाषाण''
प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
कोल्हापूर, ता. २५ : मोरेश्‍वर कुंटे आणि विजया कुंटे दांपत्याच्या संग्रहातील मंदिरांच्या छायाचित्रांचे ‘गाणारे दगड बोलणारे पाषाण’ प्रदर्शन आजपासून सुरू झाले. त्याला रसिकांचा मोठा प्रतिसाद मिळतो आहे. येथील राजर्षी शाहू स्मारक भवनात सलग तीन दिवस सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे.
कुंटे दांपत्याने दुचाकीवरून भटकंती करत राज्यातील अठरा हजारांहून अधिक मंदिरे पाहिली आहेत. त्याचा एक मंदिर कोष त्यांनी तयार केला आहे. ‘सहस्त्र गणपती सहस्त्र कथा’ हे पुस्तकही लिहिले असून त्याचे प्रकाशन प्रसिद्ध दुर्गअभ्यासक डॉ. अमर अडके, मूर्ती व मंदिर अभ्यासक उमाकांत राणिंगा यांच्या हस्ते झाले. दरम्यान, प्रदर्शनात पाण्यावर तरंगणाऱ्या विटा, दगडातून येणारा घंटेसारखा आवाज असे गाणारे दगडही पहायला मिळणार आहे. उद्‍घाटनावेळी ‘संस्कारभारती’च्या महानगर अध्यक्षा डॉ. जुई कुलकर्णी, इंद्रनील बंकापुरे, महेश सोनुले, गणेश अभ्यंकर आदी उपस्थित होते. वेदा सोनुले यांनी स्वागत केले.
------------------
डॉ. वासंती इनामदार-जोशी यांचे
साहित्यिक योगदान अतुलनीय
नितीन कुलकर्णी : स्मृतिदिनानिमित्त स्मृतींना उजाळा
कोल्हापूर, ता. २५ : कथा, कविता, समीक्षा, बालवाङमय अशा चतुरस्त्र विषयावर विविध अनुभव कसदारपणे मांडणाऱ्या (कै) डॉ. वासंती इनामदार-जोशी यांचे साहित्यिक योगदान अतुलनीय असल्याचे गौरवोद्‍गार नितीन कुलकर्णी यांनी काढले. करवीर नगर वाचन मंदिर येथे डॉ. इनामदार-जोशी यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
जागतिक पुस्तक दिनानिमित्त साखळी योजनेतील ग्रंथालयांना ग्रंथभेट देऊन सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट वाचक पुरस्कार शरयू खात्री, मीरा मारुलकर, वंदना पोसरेकर, गो. शं. भांबुरे, विवेकानंद सोनवडेकर, विष्णू वझे यांना देण्यात आले. मेहता बुक सेलर्स यांच्यातर्फे तीन उत्कृष्ट वाचकांना ग्रंथभेट देण्यात आले. सोनवडेकर, रवींद्र कामत यांनी मनोगते व्यक्त केली. संस्थेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार जोशी, उपाध्यक्ष नंदकुमार मराठे, दीपक गावडे, कार्यवाह अश्‍विनी वळीवडेकर, कार्याध्यक्ष प्रा. डॉ. श्रीकृष्ण साळोखे, ग्रंथपाल मनीषा शेणई आदी यावेळी उपस्थित होते. महेश्‍वरी गोखले यांनी सूत्रसंचालन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com