माने अंक

माने अंक

फोटो-79882

धैर्यशील माने यांना मताधिक्य द्यावे
मेधा कुलकर्णी ः नृसिंहवाडीत महिला मेळावा

नृसिंहवाडी, ता. २५ ः केंद्र शासनाने महिलांसाठी विविध नावीन्यपूर्ण योजना राबविल्या आहेत. ज्यामुळे महिलांचे जीवनमान आणि आर्थिक स्तर उंचावला आहे. खासदार धैर्यशील माने यांनीही मतदारसंघात महिलांसाठी विविध योजना व त्यासाठी निधी खेचून आणला आहे. त्यामुळे महिलांच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील राहणाऱ्या धैर्यशील माने यांना मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी केले.
हातकणंगले लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ येथे आयोजित महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. त्यानंतर त्यांनी इचलकरंजीत विविध ठिकाणी भेटी देऊन धैर्यशील माने यांना साथ देण्याचे आवाहन केले.
माजी खासदार निवेदिता माने म्हणाल्या,‘केंद्र व राज्य शासनाने बचत गटाच्या माध्यमातून महिलांना आर्थिक मदत पोहोचवली आहे. महिलांना सक्षम करण्यासाठी कटिबद्ध असलेल्या धैर्यशील मानेंना साथ द्या’
संघटक नीता केळकर यांचे भाषण झाले. भाजप जिल्हा महिला आघाडीच्या सरचिटणीस रमा फाटक, जिल्हाध्यक्षा पुष्पा पाटील, नूतनकुमारी, वर्षा पाटील, तेजस्विनी पाटील, डॉ. नीता माने, स्वाती पाटील, महादेवी बिराजदार, रागिणी शर्मा, जिल्हा उपाध्यक्षा अंजुम जमादार, माधवी पाटील आदी उपस्थित होत्या.

चौकट
वाळव्याच्या विकासासाठी
साथ द्या ःधैर्यशील माने

येडेमच्छिंद्र ही क्रांतीची भूमी आहे. इथे दिलेला प्रत्येक शब्द हे माझे वचन असून, भविष्यकाळात वाळवा तालुक्यातील प्रत्येक भागांत विकासकामे पोहोचवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. वाळवा तालुक्याने मला मताधिक्य द्यावे, असे आवाहन खासदार धैर्यशील माने यांनी केले. वाळवा तालुक्यातील येडेमच्छिंद्र येथील क्रांतिसिंह पाटील व्यासपीठावरून ते प्रचारसभेत बोलत होते. प्रचार सभेपूर्वी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com