जिल्हाधिकारी येडगे यांच्याकडून प्रातिनिधीक स्वरुपात वोटर्स स्लिपचे वाटप

जिल्हाधिकारी येडगे यांच्याकडून प्रातिनिधीक स्वरुपात वोटर्स स्लिपचे वाटप

फोटो ः 79886

जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रातिनिधिक
स्वरूपात व्‍होटर्स स्‍लिपचे वाटप

कागल, गडहिंग्लज, गारगोटीत स्ट्राँग रूमना भेट

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २५ : कागल शहरातील केंद्र क्र.१७ मधील आण्णासो ब्याकुडे, राजाराम भुरले यांना प्रातिनिधिक स्वरूपात मतदार माहिती चिठ्ठ्यांचे (व्‍होटर स्लिपचे) वाटप जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते झाले. यावेळी उपस्थित मतदारांना त्यांनी मतदान करण्याचे आवाहन केले. त्यानंतर जिल्हाधिकारी येडगे यांनी कागल, गडहिंग्लज, गारगोटी, आजरा येथील ईव्हीएम स्ट्राँग रूम, मतदान साहित्य वाटप व स्वीकृती ठिकाण, स्थिर सर्वेक्षण पथक आणि मतदान यंत्र ठेवलेल्या ठिकाणालाही भेट दिली.
जिल्हाधिकारी येडगे यांनी ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांसाठी देण्यात येणाऱ्या घरबसल्या मतदान सुविधेसह व्‍होटट स्लिप वाटपाचा आढावा घेतला. त्यानंतर सुळकूड येथील स्ट्राँग रूम व स्थिर सर्वेक्षण पथकाला भेट देऊन सर्व वाहनांची कडक तपासणी करण्याच्या सूचना दिल्या. कागल, गडहिंग्लज, गारगोटी, आजरा तालुक्यांमधील मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी व्यापक जनजागृती करण्याच्या सूचनाही दिल्या. प्रांताधिकारी सुशांत बनसोडे, तहसीलदार अमरदीप वाकडे, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) अनंत खोत, तलाठी सुनील खेडकर तसेच संबंधित अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
मतदार जनजागृतीसाठी प्रत्येक वॉर्ड, वस्तीवर यंत्रणा पोहोचवा. विविध कार्यक्रमांची अंमलबजावणी करून मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी प्रयत्न करा, अशा सूचना जिल्हाधिकारी येडगे यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com