आंबा भाव घसरले

आंबा भाव घसरले

हापूस बॉक्स @ २००
आवक वाढल्याने दर उतरले
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २५ : गेल्या आठ दिवसांत झालेले ढगाळ वातावरण, तसेच आंब्याची वाढती आवक त्यामुळे हापूस आंब्याचे दर उतरले आहेत. साडेतीनशे रुपयांचा बॉक्स भाव सध्या २०० ते २५० रुपयांपर्यंत खाली आला. १८०० रुपयांच्या पेटीचा भाव १२०० रुपये पेटीपर्यंत खाली आला. त्यामुळे हापूस आंबा खाणाऱ्यांना संधी आली आहे.
दोन महिन्यांपूर्वी कोल्हापुरात हापूस आंब्याचे आगमन झाले. त्यानंतर आवक तुरळक होती. गेल्या चार दिवसांत कोकणातून परदेशात जाणाऱ्या आंब्याची मागणी कमी झाली. यात ढगाळ वातावरण तयार झाले. अशा आंबा झाडावर किंवा आडीत पिकविण्यासाठी राहिला तर तो खराब होण्याची शक्यता असल्याने आंबा बागायतदारांनी आंबा बाजारपेठेकडे पाठवला. त्यामुळे कोल्हापुरात आवक वाढली. सध्या रोज ६०० ते ८०० पेट्या, तर १३ ते १४ हजार बॉक्सची आवक होत आहे. त्यामुळे आंबा आवक वाढली.
यात शहरात विविध स्टॉल्सवर आंबा विक्रेत्यांनी बाजार समितीत आंबा न घेता थेट कोकणातील एजंटाकडून आंबा खरेदी करून विक्री सुरू केली. त्यांच्याकडे आंबा स्वस्त मिळत आहे. बाजार समितीत घाऊक बाजारपेठेत बॉक्सचा सरासरी भाव कमीत कमी १०० ते २०० रुपये आहे. असा बॉक्स किरकोळ बाजारात २०० ते २५० रुपयाला मिळत आहे.
--------------------
अन्य आवक कमी
सर्वच प्रकारच्या आंब्यामध्ये एका बॉक्समध्ये १२ ते १६ आंबे असतात. लहान-मोठे आंबे बघून त्याची बॉक्समधील संख्या ठरते. दक्षिण भारतीय आंबा, मद्रास हापूस आंबा २०० ते २५० रुपये बॉक्स व लालबाग आंबा ८० ते १५० रुपये बॉक्स, असे भाव आहेत. त्याची आवक जेमतेम आहे, त्यामुळे फारसे भाव कमी झालेले नाहीत.
---------------
कोट
आंब्याची आवक वाढू लागली आहे. पाऊस पडल्यास आंबा खराब होतो. त्यामुळे आंब्याचे भाव कमी होत आहेत. यापेक्षा आणखी भाव कमी होण्याची शक्यता कमी आहे. सध्याच्या आवकेतील आंबा चांगल्या दर्जाचा आहे. त्यामुळे ग्राहकांचा प्रतिसाद मिळत आहे.
- सादीक बागवान, विक्रेते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com