अपक्ष उमेदवार प्रचार

अपक्ष उमेदवार प्रचार

आम्हालाही मतदान करा...
हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील अपक्ष व अन्य पक्षांच्या उमेदवारांचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २९ : लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर मतदारसंघातून हातकणंगले मतदारसंघातून २७ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. यातील राष्ट्रीय पक्षांचे उमेदवार वगळता बहुतांशी उमेदवार स्थानिक पक्षांचे किंवा अपक्ष आहेत. कोणी सायकलवर फिरून, कोणी दुचाकीला फलक लावून, तर काही उमेदवारांनी रिक्षा, टेम्पोला फलक लावून प्रचार सुरू केला आहे. भ्रष्टाचार, रोजगार, महागाई, संविधान रक्षण, पाणी, आरोग्य असे मुद्दे घेऊन हे उमेदवार आपली भूमिका मतदारांना पटवून देत मतदानाचे आवाहन करत आहेत. त्यांच्याशी साधलेला हा संवाद...

ठळक वापरणे

286.jpg 80459
शेतकरी नेते व अपक्ष उमेदवार रघुनाथ पाटील मतदारांशी थेट संवाद साधताना.

थेट मतदारांशी संवाद साधून मांडतो भूमिका ः रघुनाथ पाटील
वन्यजीव संरक्षण कायदा शेतकऱ्यांच्या जीवावर उठला आहे. त्याला आम्ही पूर्वीपासून विरोध करत आहोत. गवे नागरी वस्तीत येत आहेत. भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढत आहे. आम्ही यापूर्वी केलेल्या मागण्या आता शेतकऱ्यांना पटत आहेत. त्यामुळे प्रचाराला मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. सर्व मतदारसंघात प्रचार फेरी पूर्ण झाली आहे. सकाळपासून प्रचाराला सुरुवात केली जाते. सोबत प्रचार पत्रकांचे वाटप करीत आमची भूमिका थेट मतदारांशी संवाद साधून मांडत आहोत. ‘गोड उसाची कडू कहाणी’ या पुस्तिकेच्या माध्यमातून राजू शेट्टी व साखर कारखानदारांनी कशी फसवणूक केली आहे, याची माहिती मतदारांना देत आहोत. दुधाचे दर कसे पाडले, हे सांगत आहोत. शासनाच्या धोरणांमुळे शेतीची वाट लागली, शेतकरी देशोधडीला लागला आहे. हे थांबवायचे असेल, तर शेतकरी चळवळीतील माझ्यासारख्या माणसाला निवडून देण्याची गरज आहे.
.................
80087
देशातील हुकूमशाहीला विरोध ः लक्ष्मण डवरी
देशात हुकूमशाहीसारखे वातावरण आहे. मी याचा विरोध करतो. माझे गाव वाळवा तालुक्यातील येल्‍लूर आहे. मी अपक्ष असून, माझे चिन्ह अंगठी आहे. पदयात्रा, सभा यांच्‍या माध्यमातून मी प्रचार करीत आहे. डवरी समाजाला एकत्र करून त्यांच्यासमोर माझी भूमिका मांडणार आहे. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी मी लढणार आहे.
...............
80088
दुचाकीवरून फिरून प्रचार सुरू ः लक्ष्मण तांदळे
देशातील ६२ हजार शाळांचे खासगीकरण झाले आहे. शेतामधील बहुतांशी पिकांना हमीभाव नाही. शेतकरी, कामगार यांचे भविष्य सुरक्षित नाही, हे प्रश्न घेऊन निवडणूक लढवित आहे. दुचाकीवरून फिरून प्रचार सुरू आहे. माजी उमेदवारी अपक्ष असून, हिरा हे माझे निशाण आहे.
...........
80086
आरोग्याचे प्रश्‍न माझ्या अजेंड्यावर ः डॉ. ईश्वर यमगर
मी हातकणंगले येथील आहे. भारतीय लोकशाही पार्टीकडून लोकसभेचा उमेदवार असून, टिलर हे माझे चिन्ह आहे. कोपरा सभा, पदयात्रा या माध्यमातून मी प्रचार करीत आहे. इचलकरंजी येथील पाणीप्रश्न, आय. जी. एम रुग्णालयातील सेवा, असे प्रश्न घेऊन मी निवडणुकीत उतरलो आहे. यंत्रमाग आणि हातमागमधील कामगारांसाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची प्रमुख मागणी मी केली आहे. तसेच शिरोळमध्ये शासकीय कॅन्सर रुग्णालय सुरू करण्याचा विषयही अजेंड्यावर घेतला आहे.
......................
जनतेला न्याय देण्यासाठी उमेदवारी ः इम्रान खतीब
मी हातकणंगले तालुक्तील हेरले गावचा रहिवासी आहे. निवडणुकीत मी बहुजन मुक्ती पार्टीचा उमेदवार असून, माझे चिन्ह खाट आहे. मतदारसंघातील लोकांचे स्थानिक प्रश्व सोडविण्याच्या उद्देशाने मी लोकसभेला उभा आहे. प्रचारात रिक्षाच्या सहाय्याने माझी भूमिका मी मतदारांपर्यंत पोहोचवित आहे. जनतेला न्याय देण्याची माझी भूमिका आहे.
.................
लोकांना भेटून सांगतो माझी भूमिका ः धनाजी गुरव
मी शाहूवाडी तालुक्यातील शिवारे गावात टेलरिंगचा व्यवसाय करतो. लोकांना मोफत कापडी पिशवी वाटप करून पर्यावरण संवर्धनाची जनजागृती केली आहे. लोकसभा निवडणुकीत मी लोकराज्य जनता पार्टीकडून उभा आहे. रिक्षा माझे चिन्ह आहे. आता प्रचार सुरू केला आहे. लोकांना प्रत्यक्ष भेटून माझी भूमिका सांगतो. महागाई, बेरोजगारी, पर्यावरण संवर्धन या विषयांवर मी काम करणार आहे. नदी प्रदूषणाचा मुद्दाही गंभीर असून, त्यासाठी निवडून आल्यावर प्रयत्न करणार आहे.
..................
आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा ः शरद पाटील
मी भैरेवाडी (ता. पन्हाळा) येथील रहिवासी असून, नॅशनल ब्लॅक पँथर पक्षाचा अधिकृत उमेदवार आहे. आरक्षणाचे सर्वेक्षण होऊन कोणात्या जातीचे, धर्माचे किती लोक उच्चपदस्थ आहेत, याची माहिती लोकांसमोर आली पाहिजे. त्यानुसार ज्यांना आवश्यकता आहे, त्यांना आरक्षण मिळाले पाहिजे.
.................
पायी चालून प्रचार करणार ः आनंद सरनाईक
मी हातकणंगले मतदारसंघातून अपक्ष उमेदवार असून, माझे चिन्ह टॉर्च आहे. मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, ही माझी भूमिका आहे. यासाठी मी पायी चालून प्रचार करीत आहे. मतदान झाले की, मी दिल्लीला पदयात्रा करणार आहे.
...................
सोशल मीडियावरूनच सर्व प्रचार ः प्रा. परशुराम माने
मी जयसिंगपूरचा रहिवासी असून, लोकसभा निवडणुकीत हातकणंगले मतदारसंघातून अपक्ष म्हणून उभा आहे. सफरचंद हे माझे चिन्ह आहे. कामगार, शेतकरी यांचे कल्याण, पाणी, आरोग्याचे प्रश्न सोडवण्याची माझी भूमिका आहे. माझा सारा प्रचार सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू आहे. माझी भूमिका मी त्याद्वारे मांडतो.
............
दोन्ही मतदारसंघांतून उमेदवारी ः अरविंद माने
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून भारतीय राष्ट्रीय दलाकडून निवडणूक लढविणार आहे, तर हातकणंगले मतदारसंघातून अपक्ष लढविणार आहे. मूळचा मुडशिंगी गावातील आहे. घरेघरी फिरून मी भूमिका मांडत आहे. आय. टी. पार्क, रोजगार देणारे उद्योग यासाठी पाठपुरावा करणार आहे.
...........
समतेच्या विचारांसाठी मैदानात ः आनंद थोरात
सर्वांना विकासाची समान संधी मिळाली पाहिजे, हा समतेचा विचार शाहू, फुले आणि डॉ. आंबेडकरांनी मांडला. तोच विचार घेऊन मी निवडणुकीला सामोरे जात आहे. मी मूळचा गोटखिंडी (ता. वाळवा) येथील असून, हातकणंगले मतदारसंघातून अपक्ष उमेदवार आहे. किटली माझे चिन्ह आहे. माझ्या प्रचाराची गाडी सर्वत्र फिरत आहे. मी लोकांमध्ये जाऊन भूमिका मांडत आहे.
................
नागपंचमीस जिवंत नागाची पूजा हवी ः राजेंद्र माने
मी शिराळा गावचा असून, हातकणंगलेमधून अपक्ष उमेदवार आहे. माझे चिन्ह टीव्ही आहे. बत्तीसशिराळ्याची नागपंचमी मोठी असते. त्यामध्ये जिवंत नागाची पूजा करू द्यावी. ही मागणी लोकसभेत मांडणार आहे. तसेच पाणी, आरोग्य या प्रश्वांच्या सोडवणुकीसाठी काम करणार आहे. सध्या घरोघरी जाऊन प्रचार सुरू आहे.
..............
भ्रष्टाचारमुक्त समाजासाठी राजकारणात ः रामचंद्र साळुंखे
देशात भ्रष्टाचारमुक्त समाजाची निर्मिती व्हावी, हे माझे धोरण आहे. यासाठी निवडणुकीच्या माध्यमातून राजकारणात काम करीत आहे. मी वाळवा तालुक्यातील शिगावचा असून, अपक्ष म्हणून हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून उभा आहे. कपाट ही माझी निशाणी आहे. बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य हे मुद्दे घेऊन प्रचार करणार आहे.

........
हमीभावासाठी सायकलवरून प्रचार ः शिवाजी संकपाळ
मी शिरोळ गावचा रहिवासी असून, हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार आहे. शेतीमालाला हमीभाव मिळाला पाहिजे. हा प्रचाराचा मुख्य मुद्दा आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर जाऊन मी माझी भूमिका सांगत आहे. माझा सायकलवरून प्रचार सुरू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com