नॅनोसायन्स अधिविभागात गुरुवारपासून ‘ओपन डे’

नॅनोसायन्स अधिविभागात गुरुवारपासून ‘ओपन डे’

नॅनोसायन्स अधिविभागात
गुरुवारपासून ‘ओपन डे’
कोल्हापूर ः शिवाजी विद्यापीठातील स्कूल ऑफ नॅनोसायन्स अँड बायोटेक्नॉलॉजी अधिविभागामध्ये ‘ओपन डे’चा उपक्रम गुरुवारी (ता. २) आणि शुक्रवारी (ता.३ ) आयोजित केला आहे. या उपक्रमात गुरुवारी वैज्ञानिक पोस्टर कॉम्पिटिशन आणि शुक्रवारी वैज्ञानिक मॉडेल कॉम्पिटिशन असणार आहे. ही स्पर्धा दोन गटांत होणार असून, इयत्ता बारावी सायन्स शाखेतील विद्यार्थ्यांचा एक गट व कोणत्याही विज्ञान विषयाच्या पदवी शाखेतील विद्यार्थ्यांचा दुसरा गट असणार आहे. या दोनही दिवशी नॅनोसायन्स आणि नॅनोतंत्रज्ञानावर आधारित विज्ञान-प्रदर्शनही सर्वांसाठी खुले असणार आहे. या स्पर्धांचे परीक्षक म्हणून भाभा अनुसंधान संशोधन केंद्र मुंबईतील शास्त्रज्ञ डॉ. नंदिता मयती, नीलोत्पल बरूआ उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती ‘स्कूल ऑफ नॅनोसायन्स’चे संचालक प्रा. किरणकुमार शर्मा यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com