इचल : अभिनेता गोविंदा प्रचारासाठी इचलकरंजीत

इचल : अभिनेता गोविंदा प्रचारासाठी इचलकरंजीत

80624
इचलकरंजी ः ताराराणी पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ आयोजित महिला मेळाव्यात बोलताना अभिनेता गोविंदा. व्यासपीठावर उपस्थित आमदार प्रकाश आवाडे, वेदांतिका माने, किशोरी आवाडे, राहुल आवाडे, उर्मिला गायकवाड आदी.
...
धैर्यशील मानेंसाठी अभिनेता गोविंदाची साद
ताराराणी पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने इचलकरंजीत मेळावा
इचलकरंजी, ता. २९ ः ‘महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना विजयी करा’, अशी साद अभिनेता गोविंदा यांनी घातली. पंचरत्न मंगल कार्यालयात ताराराणी पक्षाच्या वतीने आयोजित महिला मेळाव्याला त्यांनी उपस्थिती लावली. यावेळी आपल्या स्टाईलमध्ये त्यांनी आपल्या चित्रपटातील काही डॉयलॉग सादर केले. तर एका गाण्यावर नृत्य करीत धमाल उडवून दिली.
या मेळाव्याचे आकर्षण अभिनेता गोविंदा होते. त्यांचे आगमन होताच महिलांनी एकच जल्लोष केला. त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी महिलावर्गाची प्रचंड झुंबड उडाली आली. हिंदी व मराठी अशा दोन्ही भाषेत त्यांनी यावेळी संवाद साधला. ‘गत दहा वर्षांत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र आणि दोन वर्षांत राज्य सरकारने विविध विकासकामे केली आहे. सर्वसामान्यांना न्याय दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अत्यंत चांगले काम करीत आहेत. या ठिकाणी जमलेली महिला शक्ती पाहता माने यांचा विजय निश्चित आहे’, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
मेळाव्याचे संयोजक आमदार प्रकाश आवाडे म्हणाले, ‘धैर्यशील माने यांना मत म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींना मत मिळणार आहे. त्यांना या निमित्ताने विजयी करण्याचा आम्ही निर्धार करीत आहोत. इचलकरंजीत महिला बचत गटाच्या माध्यमातून लखपती दीदींची संख्या लक्षणीय आहे. विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून आणि महिला सक्षमीकरणातून त्यांना उद्योजिका बनविले आहे. आता गारमेंट सिटीवरून इचलकरंजीत थेट साडी उत्पादन आणि कपड्यांपासून बाहुल्या तयार करण्याचा उद्योग सुरू करण्याचा मानस आहे.’
वेदांतिका माने म्हणाल्या, ‘अभिनेता गोविंदा यांच्या उपस्थितीने मेळाव्यात मोठी ऊर्जा निर्माण झाली आहे. महिलाशक्ती जागृत झाली असून, ती नक्कीच धैर्यशील माने यांच्या पाठीशी राहील. माने घराण्याने जनसेवेचे व्रत घेतले आहे. केवळ राजकारण नव्हे तर समाजकारण करण्याचे काम गेली अनेक वर्षे केले जात आहे. त्यामुळे माने यांना मत म्हणजे कर्तृत्वान नेतृत्वाला मत असणार आहे.’
शिवसेनेच्या उपनेत्या शीतल म्हात्रे यांनी केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेतला. यावेळी राहुल आवाडे यांच्यासह उर्मिला गायकवाड, किशोरी आवाडे, अहमद मुजावर आदींची भाषणे झाली. स्वागत मौसमी आवाडे यांनी केले. प्रास्ताविक प्रकाश दत्तवाडे यांनी केले. नजमा शेख यांनी आभार मानले. यावेळी बाळासाहेब कलागते, नरसिंग पारीक, सतीश मुळीक, राजू बोंद्रे, दीपक सुर्वे, नीतेश पोवार आदी उपस्थित होते.
...
महिलांची गर्दी
महिलांच्या अभूतपूर्व गर्दीत हा मेळावा पार पडला. मुख्य मंडपासह शेजारी दोन मंडपातही बैठक व्यवस्था करण्यात आली होती. त्यातील दोन मंडपात मोठी स्क्रीन लावण्यात आली होती. रखरखत्या उन्हातही महिलांची उपस्थिती लक्षवेधी होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com