‘पीएचडी’ मार्गदर्शकांकडून मागविली जागांची माहिती

‘पीएचडी’ मार्गदर्शकांकडून मागविली जागांची माहिती

विद्यापीठ ..लोगो
...
‘पीएच.डी.’ मार्गदर्शकांकडून मागविली जागांची माहिती
‘नेट’ परीक्षेच्या माध्यमातून प्रवेश प्रक्रिया राबविणार; शिवाजी विद्यापीठाची तयारी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २९ ः कला, वाणिज्य आणि विज्ञान विद्याशाखांतील पीएच.डी. अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची प्रक्रिया विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) निर्देशानुसार राबविण्याची तयारी शिवाजी विद्यापीठाने सुरू केली आहे. त्यातील पहिला टप्पा म्हणून विद्यापीठाने पीएच.डी. गाईड (मार्गदर्शक) यांच्याकडे उपलब्ध असलेल्या जागांची माहिती मागविली आहे.
यूजीसीने राष्ट्रीय पात्रता परीक्षेला (नेट) पीएच.डी. प्रवेश परीक्षेचा दर्जा दिला आहे. या परीक्षेच्या माध्यमातून विद्यापीठांनी पीएच.डी. प्रवेशाची कार्यवाही करावयाची आहे. त्यानुसार शिवाजी विद्यापीठाने तयारीची सुरुवात केली आहे. विविध विद्याशाखांतील पीएच.डी. अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विद्यापीठाच्या पातळीवर आतापर्यंत स्वतंत्रपणे पीएच.डी. प्रवेश परीक्षा (पेट) घेतली जात होती. मात्र, यूजीसीच्या सूचनेनुसार आता ‘पेट’ परीक्षा विद्यापीठ बंद करणार आहे. ‘नेट’नुसार प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार असून त्याचे स्वरुप निश्चित करणार आहे. त्याबाबत विद्यापीठाच्या विद्या आणि व्यवस्थापन परिषदेमध्ये चर्चा करून पुढील कार्यवाही होणार आहे. दरम्यान, सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षातील पीएच.डी. प्रवेशाची प्रक्रिया विद्यापीठातील अधिविभागांच्या पातळीवर सध्या सुरू आहे. त्यात संशोधन सल्लागार समितीची बैठक, लेखी आणि मुलाखतीनंतर गुणवत्ता यादी, अंतिम निवड यादीची प्रसिद्धी आदींचा समावेश आहे.
...
प्रथम वर्ष प्रवेश अर्ज करण्यास मुदतवाढ
सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात विद्यापीठ अधिविभाग व संलग्नित महाविद्यालयांतील एम.एस्सी. आणि विद्यापीठ अधिविभागांमधील एम.ए., एम.कॉम., एम.ए. संगीत, एलएलएम., मास्टर ऑफ रुरल स्टडीज, एम.लिब., एम.एस्सी. मॅथेमेटिक्स विथ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन), एमसीए (कॉम्प्युटर सायन्स), एमबीए (डिस्टन्स मोड), बीसीए., बी.ए. स्पोर्टस्‌, फिल्म मेकिंग, बी.कॉम. बँकिंग अँड फायनान्स आदी अभ्यासक्रमांच्या भाग एकच्या प्रवेश परीक्षेसाठी १० मेपर्यंत आणि ज्या अभ्यासक्रमांना प्रवेश परीक्षा नाही अशा अभ्यासक्रमांना प्रवेश‍ अर्ज भरण्यासाठी २५ मेपर्यंत मुदतवाढ दिली असल्याची माहिती कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी दिली.
...
जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मुदत
विद्यापीठातील पीएच.डी. प्रवेशाची प्रक्रिया यूजीसीच्या निर्देशानुसार राबविली जाणार आहे. लेखीपरीक्षेनंतर मुलाखत आणि अन्य प्रक्रियेचे स्वरुप अधिकार मंडळांकडून घेतला जाणार आहे. सध्या पीएच.डी. गाईडकडे असणाऱ्या रिक्त जागांची माहिती मागविली आहे. त्यासाठी जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मुदत दिली असल्याचे ‘पीजीबीयूटीआर’ विभागाचे उपकुलसचिव डॉ. विलास सोयम यांनी सांगितले.
...
पहिल्या श्रेणीतील विद्यार्थ्यांची मुलाखत
‘नेट’परीक्षेत तीन श्रेणी ठरविण्यात आल्या आहेत. त्यामधील पहिल्या श्रेणीत सर्वाधिक गुण असणारे विद्यार्थी राहणार आहेत. पीएच.डी. प्रवेश आणि पाठ्यवृत्तीसह जेआरएफ, सहायक प्राध्यापक पदासाठी ते पात्र ठरणार आहेत. त्यांना पीएच.डी. प्रवेशासाठी मुलाखत द्यावी लागणार आहे.
...
विद्यापीठातील वर्षनिहाय पीएच.डी. प्रवेशित विद्यार्थी
२०१६-१७ : ७०७
२०१७-१८ : ६८९
२०१८-१९ : ५४७
२०१९-२० : ५०९
२०२०-२१ : ५६९
२०२१-२२ : ५६४

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com