प्रवासी महिलेचा सव्वा लाखाचा ऐवज लंपास

प्रवासी महिलेचा सव्वा लाखाचा ऐवज लंपास

बसस्थानकावरून
पर्स पळविली

कोल्हापूर, ता. २९ ः मध्यवर्ती बसस्थानकावर आलेल्या प्रवासी महिलेची पर्स अज्ञाताने पळवली. सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास हा प्रकार घडला. याबाबत पूनम श्रीकांत कांबळे (वय ३८, रा. तळेगाव दाभाडे, पुणे) यांनी शाहूपुरी पोलिसांत फिर्याद दिली.
पूनम कांबळे दुपारी बाराच्या सुमारास मध्यवर्ती बसस्थानक परिसरात आल्या होत्या. अज्ञाताने त्यांची पर्स पळविली. पर्समध्ये दोन तोळे वजनाचे गंठण, मोबाईल हॅन्डसेट, रोख रक्कम असा सव्वा लाखाचा ऐवज चोरीस गेला. दोन दिवसांपूर्वीच मध्यवर्ती बसस्थानकावरून गडहिंग्लजच्या महिलेचे १४ तोळे दागिने चोरल्याचा प्रकार घडला होता. शाहूपुरी पोलिस लोकसभा निवडणुकीत व्यस्त असल्याने केवळ दोन कर्मचाऱ्यांवर भार होता. दोन दिवसांत प्रवाशांचे चार ते पाच मोबाईल लंपास झाल्याचे प्रकार घडले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com