प्रशांतची एक्झिट

प्रशांतची एक्झिट

फोटो ४३९०
...

चिमगाव येथे विहिरीत दरडीला
धडकून शाळकरी मुलाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
मुरगूड, ता. २९ : चिमगाव (ता. कागल) येथील प्रशांत रामचंद्र करडे (वय १५) या नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा विहिरीत सूर मारताना दरडीला धडकून दुर्दैवी मृत्यू झाला.
याबाबत अधिक माहिती अशी, आज सकाळी प्रशांत हा शेतावर जाऊन जनावरांसाठी वैरणही घेऊन आला. त्यानंतर अकराच्या सुमारास मित्रांबरोबर तो गावापासून जवळच असलेल्या विहिरीवर अंघोळीला गेला. अरुंद विहिरीवरच्या दरडीवरून त्याने पाण्यात जोरात सूर मारला. हा सूर त्याच्यासाठी जीवघेणा ठरला. तीन-चार मिनिटे झाली तरी तो पाण्याबाहेर न आल्याने मित्र घाबरले आणि आरडाओरडा सुरू झाला.
गावापासून हाकेच्या अंतरावरच विहीर असल्यामुळे आरडाओरडा ऐकून गावातील तरुणांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यातील अमर एकल, आनंदा करडे आदी तरुणांनी क्षणार्धात विहिरीत उड्या मारल्या. अवघ्या दहा मिनिटांत त्यांनी प्रशांतला पाण्याबाहेर काढले. मात्र, त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता. मनाला चटका लावणाऱ्या त्याच्या अपघाती मृत्यूने करडे कुटुंबासह संपूर्ण गावावर शोककळा पसरली. घटनास्थळी मुरगूड पोलिसांनी भेट घेऊन पंचनामा केला. विच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. शोकाकुल वातावरणात त्याच्यावर गावात अंत्यसंस्कार केले. घटनेची नोंद मुरगूड पोलिसांत झाली आहे. त्याच्या मागे आई, वडील, बहिणी असा परिवार आहे.
...
निकालाआधीच नियतीचा घाला
प्रशांत मुरगूड येथे शिवराज विद्यालयात नववीच्या वर्गात शिकत होता. एनसीसी पथकाचा आक्रमक सार्जंट म्हणून त्याला गौरविले होते. एटीसी हा पंधरा दिवसांचा कॅम्प त्याने पूर्ण केला होता. त्याचा स्वभाव बोलका आणि मनमिळाऊ होता. घरची परिस्थिती बेताची असल्याने शाळा शिकत तो वडिलांना शेतीकामातही मदत करत असे. एक मे रोजी त्याचा नववीच्या वार्षिक परीक्षेचा निकाल लागणार होता. मात्र, निकालाच्या अगोदरच नियतीने त्याच्यावर घाला घातला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com