कोड चुकला, पेपर पुन्हा सोडवून घेतला

कोड चुकला, पेपर पुन्हा सोडवून घेतला

कोड चुकला, पेपर पुन्हा सोडवून घेतला
विद्यार्थ्यांना नाहक त्रासः शिवाजी विद्यापीठाच्या ‘केमिस्ट्री’ विभागातील गोंधळ

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३० : परीक्षा यंत्रणेतील दुर्लक्षितपणाचा फटका शिवाजी विद्यापीठातील रसायनशास्त्र (केमिस्ट्री) अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बसला. चुकीच्या सब्जेक्ट कोडचा (विषय सांकेतिक क्रमांक) पेपर हातात पडल्याचे विद्यार्थ्यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर यंत्रणा जागी झाली. योग्य कोडचा पेपर देऊन तो पुन्हा सोडवून घेण्यात आला. चूक नसताना देखील विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला.
गेल्या दीड आठवड्यांपूर्वी ॲप्लाईड ॲडव्हॉन्स केमिस्ट्रीचा पेपर होता. सकाळी १०.३० ते दुपारी १.०० अशी त्याची वेळ होती. त्यानुसार विद्यार्थ्यांना वेळेत पेपर देण्यात आला. अर्धा तास झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या लक्षात आले की, त्या पेपरमध्ये अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्न आहेत. त्या पेपरचा कोड चुकीचा आहे. प्रवेशपत्रावरील आणि प्रत्यक्ष पेपरवर नोंदविलेला कोड तपासला असता त्यामध्ये फरक असल्याचे त्यांना दिसून आले. त्यांनी याबाबतची माहिती पर्यवेक्षकांना दिली. पर्यवेक्षकांनी परीक्षा व मूल्यमापन मंडळाला कळविले. त्यावर तातडीने कार्यवाही करीत विद्यार्थ्यांना योग्य कोडचा पेपर देण्यात आला. या गोंधळामुळे विद्यार्थ्यांना दुपारी बारा ते तीन यावेळेत पेपर सोडवावा लागला. त्यानंतर दोन दिवसांनी ॲप्लाईड ऑर्गनिक केमिस्ट्री विषयाच्या पेपरवेळी देखील पुन्हा असाच गोंधळ निर्माण झाला. त्यामुळे या अधिविभागामध्ये परीक्षेचे काम गांभीर्यपूर्वक होत नसल्याचे दिसून आले आहे.
...
‘एसआरपीडी’ समन्वयक करतात काय?
पेपर सुरू होण्यापूर्वी परीक्षा मंडळाकडून एक तास आधी कोड आणि पासवर्ड संबंधित अधिविभागातील ‘एसआरपीडी’ समन्वयकांकडे येतो. त्यासह त्यांना लिखित स्वरूपात पेपरचे नाव आणि कोड याबाबतची माहिती दिलेली असते. पेपरचा कोड आणि नाव सारखेच असल्याची खात्री करून या समन्वयकांनी विद्यार्थी संख्येनुसार पेपरची प्रिंट काढायची असते. मग, केमिस्ट्री अधिविभागातील या दोन पेपरबाबत घडलेला प्रकार पाहता समन्वयकांकडून खात्री करण्यात आली नव्हती का? असा प्रश्न उपस्थित होतो.
...
प्रकरणाची चौकशी करणार
केमिस्ट्री विषयाच्या पेपरवेळी घडलेल्या प्रकाराची प्राथमिक स्वरूपातील माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाने घेतली आहे. या प्रकरणाची चौकशी केली जाणार असल्याचे परीक्षा मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांनी सांगितले. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ॲडव्हान्स अकौंटन्सी पेपर क्र. ३ फुटला असल्याची माहिती मिळाली. त्याची देखील चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्यातील दुसरी बैठक ११ मे रोजी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com