तापमानाचा पारा ४० ते ४१ अंशावर

तापमानाचा पारा ४० ते ४१ अंशावर

फोटो ः 80763

गरम वारा, ४१ अंश सेल्सिअसवर पोहोचला पारा
कोल्हापूरची रेकॉर्ड मोडण्याच्या दिशेने वाटचाल; ४ ते ७ मे दरम्यान उष्णतेच्या लाटेची शक्यता

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३० : यंदा कोल्हापूरच्या तापमानाचे ४२.३ अंश सेल्सिअस रेकॉर्ड मोडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जिल्ह्यात ४ ते ७ मे दरम्यान उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून, मतदानादिवशी प्रशासनाने अलर्ट राहण्याची गरज व्यक्त होत आहे. दरम्यान, शहर परिसरातील तापमानाचा पारा ४१ अंश सेल्सिअसवर पोहोचल्याने नागरिकांच्या अंगाची आज लाही लाही झाली. गरम वाऱ्याच्या झळा तोंडावर बसत असल्याने दुपारी मुख्य मार्गांवरील वर्दळ कमी जाणवली.
कोल्हापुरात १९८८ ला ४२.३ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली होती. ते कोल्हापूरच्या हवामानाच्या इतिहासात रेकॉर्ड मानले गेले होते. ते रेकॉर्ड यंदा मोडण्याची शक्यता हवामान अभ्यासक राहुल पाटील यांनी वर्तवली. कोल्हापूरचे तापमान काही दिवसांपूर्वी ४० अंश सेल्सिअसवर इतके होते. त्यानंतर पडलेल्या वळीव पावसानंतर तापमानाचा पारा कमी झाला; मात्र आज तापमानाचा पारा चढल्याने नागरिक हैराण झाले. अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्याने दुपारी बाहेर पडणे अनेकांनी टाळले. महिला, युवती तोंडावर स्कार्फ बांधून खरेदीसाठी बाजारात आल्या. शरीराला थंड करण्यासाठी काहींनी कोल्ड्रिंक्स हाऊसमध्ये जाणे पसंत केले. कलिंगड, अननस, लिंबू सरबत, सोड्याच्या गाड्यांवर काहींनी ठिय्या मारला. पंखे असूनही मध्यवर्ती बसस्थानकात आलेल्या प्रवाशांना उष्णतेचा सामना करावा लागला. दरम्यान, पुण्यात ४२, सातारा ४०, सांगली ४१, सोलापूर ४२, तर रत्नागिरीत ३५ अंश सेल्सिअस तापमान आज होते.
------------------
घड्याळ वापरून हे तापमान त्यात घालावे
* असे होते आजचे तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
सकाळी
- ६ : ०० - २४
- ८ : ०० - २९
- १० : ०० - ३५

दुपारी - १२ : ०० - ३९
- १ : ३० - ४१.

सायंकाळी - ४ : ०० - ३८
- ६ : ०० - ३३
- ८ : ०० - ३०.

रात्री - १० : ०० - २८.
-------------------
ठळक चौकट
तापमानाचा अंदाज असा
* तारीख * किमान * कमाल
* १ मे * २५ * ३९
* २ मे * २४ * ३९
* ३ मे * २६ * ४१
* ४ मे * २७ * ४३
* ५ मे * २८ * ४३
* ६ मे * २८ * ४३.
-------
कोट
जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांत ४ ते ७ मे दरम्यान उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता आहे. तापमान ४३ ते ४४ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. या परिस्थितीत ७ मे रोजी मतदान असल्याने प्रशासनाने मतदान केंद्रांच्या परिसरात उपाययोजना करणे आवश्‍यक आहे. नागरिकांनी उष्माघातापासून बचाव करण्यासाठी स्वत:ची काळजी घ्यावी.
- राहुल पाटील, मुख्य प्रबंधक, हवामान साक्षरता अभियान.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com