बाभुळकरांनी ‘चंदगड’ची जबाबदारी घ्यावी

बाभुळकरांनी ‘चंदगड’ची जबाबदारी घ्यावी

gad306.jpg
80754
मासेवाडी : डॉ. नंदिनी बाभुळकरांनी वाढदिवसानिमित्त लहान मुलांना केक भरवला. यावेळी संभाजीराजे छत्रपती, विद्याधर गुरबे, सुनील शिंत्रे, आदी उपस्थित होते.
------------------------------------------
बाभुळकरांनी ‘चंदगड’ची जबाबदारी घ्यावी
संभाजीराजे छत्रपती : डॉ. बाभुळकर-कुपेकरांचा वाढदिवस उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ३० : गडहिंग्लज तालुक्यातील ज्या गावांमध्ये दौरा असतो, तेथील लोक स्व. बाबासाहेब कुपेकरांची आठवण आवर्जून काढतात. त्यांच्या कार्याला उजाळा देतात. चार वर्षांच्या खंडांनंतर त्यांच्या कन्या डॉ. नंदिनी बाभुळकर-कुपेकर लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकारणात सक्रिय झाल्या आहेत. आता भविष्यात चंदगड विधानसभा मतदारसंघाची त्यांनी जबाबदारी घ्यावी, असे मत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केले.
लोकसभा निवडणुकीचा प्रचार दौरा आज नेसरी भागातील गावांमध्ये होता. मासेवाडी, दुगूनवाडी, मांगनूर तर्फ सावतवाडी, बुगडीकट्टी, आदी गावांतील प्रचार दौऱ्यात डॉ. बाभुळकरांचा वाढदिवस साजरा केला. त्यानिमित्ताने संभाजीराजे बोलत होते. ते म्हणाले, ‘स्व. कुपेकर यांच्यानंतर पत्नी श्रीमती संध्यादेवी कुपेकर यांचे चंदगड मतदारसंघाच्या विकासात योगदान लाभले आहे. गतवेळची निवडणूक त्यांनी लढवली नाही. तेव्हापासून कुपेकर कुटुंबीय राजकारणापासून अलिप्त आहे; परंतु लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने कन्या डॉ. बाभुळकर सक्रिय झाल्याने कार्यकर्त्यांत उत्साह दिसत आहे.’
प्रचार दौऱ्यादरम्यान प्रत्येक गावातील कार्यकर्त्यांनी वाढदिवसाबद्दल डॉ. बाभुळकरांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. मासेवाडीतील कार्यक्रमात डॉ. बाभुळकरांनी लहान मुलांसमवेत वाढदिवस साजरा केला. मुलांना त्यांनी केकही भरवला. सोमगोंडा आरबोळे, विद्याधर गुरबे, सुनील शिंत्रे, दिलीप माने, प्रशांत देसाई, गिरीजादेवी शिंदे-नेसरीकर यांची भाषणे झाली. जोतिबा टक्केकर, विकास पाटील, महेश पाटील, प्रकाश पाटील, आप्पासाहेब पाटील, आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com