सुळेकरांचे श्रद्धास्थान

सुळेकरांचे श्रद्धास्थान

पुरवणी हेड : श्री महालक्ष्मी, श्री भावेश्वरी यात्रा विशेष, सुळे
------------------------------------
gad307.jpg ः
80790
यात्रेनिमित्त सुळेमधील भावेश्वरी मंदिर रोषणाईने उजळले आहे.
------------------------------------------------
gad308.jpg ः
80791
श्री भावेश्वरी, श्री. महालक्ष्मी देवीची मूर्ती.
------------------------------------------------

गडहिंग्लज तालुक्याच्या सीमेवर वसलेले सुळे (ता. आजरा) गाव. डोंगरमाथ्यावर असलेल्या या गावात दोन देवींची मंदिरे भाविकांचे लक्ष वेधून घेतात. सुळेकरांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री भावेश्वरी व श्री महालक्ष्मी देवीची यात्रा १८ वर्षांनंतर होत आहे. त्यानिमित्त...
---------------------------------------

सुळेकरांचे श्रद्धास्थान
श्री महालक्ष्मी, श्री भावेश्वरी

सुळे हे तसे पाहिले तर छोटे खेडे. या गावात दोन देवींचे वास्तव्य आहे. या गावामध्ये प्रथम दर्शन होते ती म्हणजे भावेश्वरी. भक्तांच्या प्रत्येक गाऱ्हाण्याला पावणारी जागृत देवी म्हणून तिची ओळख आहे. तसेच भाविकांच्या नवसाला पावणारी दुसरी देवी श्री. महालक्ष्मी. या दोन्ही देवींवर ग्रामस्थांची श्रद्धा आहे.
गडहिंग्लज तालुक्यातील महागावपासून अवघ्या तीन किलोमीटरवर आणि चंदगडला जाणाऱ्या आतील रस्त्यावर वसलले एक टुमदार गाव म्हणजे सुळे. सध्या गावाची आर्थिक, भौतिक परिस्थिती बदलत चालली आहे. बदलत्या जगाबरोबर सुळे गावही बदलत आहे. गाव अनेक दुचाकी व चारचाकींसह जगाबरोबर धावताना दिसत आहे. हरितक्रांतीने प्रगत झालेल्या सुळे गावची जवारी (संकेश्वरी) मिरची चविष्ठ आहे. अनेक उत्पादक जवारी मिरचीचे उत्पादन घेऊन आपला आर्थिक डोलारा सांभाळत आहेत. या गावाने आतापर्यंत अनेक इंजिनिअर, डॉक्टर, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते दिले आहेत. वेगवान जगाच्या स्पर्धेत कोठेही कमी नसणारे हे गाव आदरातिथ्यामध्येही कुठेच कमी पडत नाही. अनेक सण, समारंभ, उत्सव, जयंत्या, सामाजिक कार्यक्रम येथे भक्तिमय वातावरणात आणि एकोप्याने साजरे केले जातात. गडहिंग्लज तालुक्याच्या सीमेवर वसलेल्या या गावातील बहुतांश तरुण नोकरीनिमित्त मुंबई, पुणे येथे आहेत. यात्रेनिमित्त हे चाकरमानी कुटुंबासह गावी आल्याने सुळे गाव गर्दीने फुलले आहे. यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना पाणी, आरोग्याच्या सुविधा ग्रामपंचायतीतर्फे उपलब्ध करून दिल्या आहेत. यात्रेसाठी विविध धार्मिक व करमणुकीच्या कार्यक्रमांची पर्वणी गावकऱ्यांना व पाहुणे मंडळींना मिळणार आहे. यात्रेसाठी घरांची रंगरंगोटी, सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता केली आहे. तब्बल दीड तपांनी यात्रा होत असल्याने गावकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे. यात्रा समिती, ग्रामपंचायत, शंभूसिंह देसाई-सरकार, मुंबईच्या सुळेकर ग्रामस्थ मंडळाने यात्रेचे नियोजन केले आहे.
----------------------
यात्रेनिमित्त कार्यक्रम
शनिवारअखेर (ता. ४) ही यात्रा चालणार आहे. मंगळवारी (ता. ३०) रात्री लक्ष्मी खेळवण्याचा कार्यक्रम उत्साहात झाला. यासाठी पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बुधवारी (ता. १) देवींची भर यात्रा आहे. या दिवशी रात्री आर्केस्ट्रा हा करमणुकीचा कार्यक्रम असून २ मे रोजी शर्यती आहेत. हातात कासरा घेऊन बैल पळवणे, जनरल बैलगाडी शर्यती, बिनदाती बैलगाडी, घोडागाडी, पाडा बैल शर्यतीचे आयोजन केले आहे. ४ मे रोजी सायंकाळी चारनंतर लक्ष्मी पावन करण्याचा (परतवणी) धार्मिक कार्यक्रम होणार आहे. सुळे प्रीमियर क्रिकेट लीग, कबड्डी स्पर्धा आणि मुलींचा प्रेक्षणीय कबड्डी सामना झाला आहे.
-------------------------------------------------

gad309.jpg ः
80792
छाया सुर्यवंशी
--------------------------------
सुळेची यात्रा २००५ मध्ये झाली होती. यावर्षीच्या यात्रेचे नियोजन वर्षापूर्वीच केले. गावातील सुविधांच्या पार्श्‍वभूमीवर सुरुवातीला यात्रा करायची की नाही, असा संभ्रम होता. तरीही गावकरी व तरुणांनी यात्रेच्या निर्णयासाठी पाठबळ दिले. यात्रेच्या पार्श्‍वभूमीवर खासदार, आमदार फंडातून महत्त्‍वाचे रस्ते, गटारी, पाण्याची सुविधा बळकट केली. यासाठी पती संदीप सुर्यवंशी यांचे सहकार्य मिळाले. त्यांनी सतत पाठपुरावा करून रात्रंदिवस काम करून या सुविधा पूर्ण केल्या. उपसरपंच संदीप नरसू चव्हाण, सतीश गणपती फडके, जयश्री सुधीर फडके, शिल्पा दीपक डोंगरे, शिवाजी सुतार, शांताबाई तुकाराम सुतार, अमित विष्णू फडके, नारायण मांगले, नारायण रेडेकर, दत्ता सलामवाडे, दीपक बाळकू डोंगरे, सुधीर तुकाराम फडके, राजाराम भैरू जाधव, प्रकाश चव्हाण, संदीप तुकाराम फडके, आदींचेही विकास कामे व यात्रा नियोजनासाठी सहकार्य मिळाले. गावकरी, मुंबईकर ग्रामस्थ मंडळ, तरुण मंडळांच्या पाठबळामुळे यात्रेचे नियोजन यशस्वी झाले.
- छाया संदीप सुर्यवंशी, सरपंच
-------------------------------------------------------
gad3010.jpg ः
80789
सूर्यकांत केसरकर

यात्रेच्या पार्श्‍वभूमीवर गावात कायदा-सुव्यवस्था राहावी यासाठी नियोजन केले आहे. यात्रा शांततेत होण्यासाठी आजरा पोलिसांचा फौजफाटा बंदोबस्तासाठी राहणार आहे. यात्रेच्या मुख्य दिवसापूर्वी पाच दिवस रिंगण (बॅरिकेडिंग) लावले जाते. जेणेकरून रथ मिरवणुकीला अडथळा येऊ नये. सकाळी पालखी सोहळा होतो. मानकरी व गावकऱ्यांकडून वाद्यांच्या गजरात तोरण घेऊन शंभूसिंह देसाई-सरकार यांच्या घरी नेले जाते. तेथून त्यांच्या घरातून तोरण मंदिरात आणले जाते. यात्रेच्या मुख्य दिवशी गावांतर्गत वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी नियोजन केले आहे. त्यासाठी पोलिसांसह खासगी कंपनीचे ४० सुरक्षारक्षक तैनात केले आहेत.
- सूर्यकांत केसरकर, पोलिसपाटील
------------------------------------------------------
पुरवणी संकलन : सुनील कांबळे, सुळे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com