मतदान जागृतीमध्ये विद्यार्थ्यांची भूमिका महत्त्वाची ः जिल्हाधिकारी येडगे

मतदान जागृतीमध्ये विद्यार्थ्यांची भूमिका महत्त्वाची ः जिल्हाधिकारी येडगे

80813
...

मतदारजागृतीमध्ये विद्यार्थ्यांचे योगदान महत्त्वाचे
जिल्हाधिकारी अमोल येडगे ः प्रशस्तीपत्रक देऊन गौरव
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २९ ः ‘मतदान हा नागरिकांचा हक्क आहे. प्रत्येकाने तो बजावला पाहिजे. यासाठी प्रशासनाकडून मतदारांमध्ये जनजागृती केली जाते. याअंतर्गतच विद्यार्थ्यांची मानवी साखळी करण्यात आली होती. यामध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतल्याने याची नोंद एशियन पॅसिफिक बुक रेकॉर्ड व नॅशनल बुक रेकॉर्डमध्ये झाली. विद्यार्थ्यांचे मतदान करण्याच्या जनजागृती मोहिमेत महत्त्वाचे योगदान आहे,’ असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. त्यांच्या हस्ते मानवी साखळीमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आले. राम गणेश गडकरी सभागृहात हा कार्यक्रम झाला.
स्वीप कार्यक्रमाचे सहायक नोडल ऑफिसर निलकंठ करे यांनी प्रस्ताविक केले. सूत्रसंचालन शीतल हिरेमठ, रावसाहेब किर्तीकर यांनी केले. वर्षा परीट यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे आयोजन सहायक निबंधक सुनील धायगुडे, कार्यालय अधीक्षक मिलिंद ओतारी, नितीन माने, उदय उलपे, सचिन पांडव यांनी केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, शिक्षणाधिकारी एकनाथ अंबोकर, प्रशासनाधिकारी शंकर यादव, उपशिक्षणाधिकारी दिगंबर मोरे उपस्थित होते.
...
या शाळांचा गौरव
मानवी साखळीत सहभागी झाल्याबद्दल पुढील शाळांचा गौरव करण्यात आला. दादासाहेब अ. मगदूम हायस्कूल, गर्ल्स हायस्कूल, इंदिरा गांधी विद्यानिकेतन, आयर्विन ख्रिश्चन हायस्कूल, जवाहरनगर हायस्कूल, कोल्हापूर इंग्लिश स्कूल, कोल्हापूर हायस्कूल, मलग हायस्कूल, महाराणा प्रताप हायस्कूल, महाराष्ट्र हायस्कूल, मनपा नेहरूनगर विद्यालय, मनपा संत रोहिदास विद्यामंदिर, मनपा वीर कक्कय विद्यामंदिर, नागोजीराव पाटणकर हायस्कूल, न्यू हायस्कूल, प्रिन्सेस इंदुमातीदेवी हायस्कूल, प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूल, प्रायव्हेट इंग्लिश स्कूल, प्रायव्हेट हायस्कूल, राजर्षी शाहू महाराज मीडियम स्कूल, नूतन मराठी विद्यालय हायस्कूल, शिवाजी मराठा हायस्कूल, नूतन मराठी ब्रँच क्र. १, श्री साई हायस्कूल ज्युनिअर कॉलेज, शा. कृ. पंत वालावलकर हायस्कूल, कोरगावकर हायस्कूल, संजीवन इंग्लिश मीडियम स्कूल, रंकाळा, सेंट झेविअर्स हायस्कूल, चाटे माध्यमिक स्कूल, कोल्हापूर पब्लिक स्कूल, जिनरत्नेय पब्लिक स्कूल, संजीवन इंग्लिश मीडियम स्कूल, कदमवाडी हायस्कूल जुना बुधवार, सौ स.म.लोहिया हायस्कूल, शाहू दयानंद हायस्कूल, विद्यापीठ हायस्कूल, विमला गोयंका इंग्लिश स्कूल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com