‘आस्की’च्या संशोधनाचा वस्त्रोद्योगाला फायदा

‘आस्की’च्या संशोधनाचा वस्त्रोद्योगाला फायदा

‘आस्की’च्या संशोधनाचा वस्त्रोद्योगाला फायदा
पंकज कुमार ः इचलकरंजीत प्रदूषणप्रश्‍नी चर्चासत्र
सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी ३० : वस्त्रोद्योगातील प्रदूषण कमी करण्यासाठी ‘आस्की’ इन्स्टिट्यूट संशोधन करणार आहे. वस्त्रोद्योगाला मोठ्या प्रमाणात फायदा होईल, असे मत युनायटेड नेशन्स इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट (युनिडो) संस्थेचे समन्वयक पंकज कुमार यांनी दिली.
वस्त्रोद्योगामध्ये होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी युनायटेड नेशन्स इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (युनिडो) व ग्लोबल इन्व्हारमेंट फाऊंडेशन (जीईएफ) तसेच भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयातर्फे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ कॉलेज ऑफ इंडिया (आस्की) या संस्थेस अभ्यास व संशोधन करण्याचे काम दिलेले आहे. या पार्श्वभूमीवर प्रकल्पाची माहिती देण्यासाठी चर्चासत्र आयोजित केले होते. वस्त्रोद्योगातील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
ग्लोबल सबस्टेक इंटरनॅशनल, दिल्लीचे संचालक परिमल सदाफळे यांनी यावर कशापद्धतीने अभ्यास होणार आहे, याचे फायदे उद्योगांना कशापद्धतीने होणार आहेत, याची माहिती दिली. यानंतर परानंदी कुमार यांनी या प्रकल्पासाठी भारतातील वस्त्रोद्योगाची आठ केंद्रांची निवड झाली आहे. यामध्ये इचलकरंजीचा प्रामुख्याने समावेश केल्याचे सांगितले. यामध्ये ग्लोबल इन्व्हॉरमेंटल फाउंडेशन हे सुमारे ३९८ कोटींची गुंतवणूक करणार असून, ‘युनिडो’ ७८ कोटींची गुंतवणूक करणार आहे. तितकीच गुंतवणूक भारत सरकारच्या वेगवेगळ्या मंत्रालयांमार्फत करण्यात येणार असल्याची माहिती दिली.
चर्चासत्रास रफिक खानापुरे, सुभाष बलवान, सोमाण्णा वाळकुंजे, पांडुरंग सोलगे, दत्तात्रय टेके, किरण पोवार, विश्वनाथ अग्रवाल, पांडुरंग धोंडपुडे, दिलीप ढोकळे, सचिन लांडगे, रवींद्र देशपांडे, ऋषिकेश जोशी, सचिन पाटील, सिद्धार्थ कामत आदी उपस्थित होते. इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्वागत केले.
-------
प्राथमिकरित्या ५० उद्योगांत प्रकल्प
अभ्यास गटाचे प्रमुख हेमंत कडू यांनी या उपक्रमाचा वस्त्रोद्योग घटकांना होणाऱ्या फायद्याची माहिती दिली. यामध्ये ५० उद्योगांमध्ये प्राथमिकरित्या प्रकल्प चालवला जाईल आणि त्यातून मिळणारी माहिती इतर उद्योगांना पुरवली जाईल. त्याचबरोबर वीज वापरातील दोष याचा अभ्यास करून वस्त्रोद्योगातील प्रत्येक घटकास याची माहिती पुरवली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी प्रश्नोत्तरे झाली. यामध्ये सतीश कोष्टी, विश्वनाथ अग्रवाल, बंडोपंत लाड, शामसुंदर मर्दा, गिरीराज मोहता, संजय मगदूम, सुरेश आमाशी यांनी भाग घेतला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com