आंतरराष्ट्रीय योगा स्पर्धेत सुजाता पाटील यांचे यश

आंतरराष्ट्रीय योगा स्पर्धेत सुजाता पाटील यांचे यश

80828
कोल्हापूर ः थायलंड येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय योगा स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या सुजाता पाटील यांचा सत्कार प्राचार्य डॉ. क्रांतिकुमार पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्राचार्या डॉ. तेजस्विनी मुडेकर, डॉ. सुनीता काळे उपस्थित होत्या.
............
आंतरराष्ट्रीय योगा स्पर्धेत
सुजाता पाटील यांचे यश

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३० ः थायलंड येथे झालेल्या नवव्या आंतरराष्ट्रीय योगा स्पर्धेत सुजाता विकास पाटील यांनी ऱ्हिदमिक योगामध्ये सुवर्णपदक आणि ट्रॅडिशनल योगात रौप्यपदकाची कमाई केली.
बँकॉक शहरात झालेल्या या स्पर्धेत भारतासह थायलंड, लाओसा, कंबोडिया, इंडोनेशिया आदी देशांतील ९२ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. त्यात सुजाता पाटील यांनी चमकदार कामगिरी केली. मूळच्या सातारा येथील असलेल्या सुजाता पाटील कमला कॉलेजमध्ये एम. ए. योगशास्त्र विभागात शिकत आहेत. त्यांना ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्राचार्य डॉ. क्रांतीकुमार पाटील, सचिव प्राजक्त पाटील, प्राचार्या डॉ. तेजस्विनी मुडेकर, योग विभागप्रमुख डॉ. सुनीता काळे, शारीरिक शिक्षण संचालिका ज्योती लेंगरे यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.
................

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com