वेदपाठक सर यांना

वेदपाठक सर यांना

80650

योगी आदित्यनाथ यांची
आज इचलकरंजीत सभा
इचलकरंजी, ता. ३० : लोकसभेच्या हातकणंगले मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उद्या (ता. १) इचलकरंजीत येत आहेत. येथील थोरात चौकात त्यांची सायंकाळी पाचला महागर्जना जाहीर सभा होणार आहे. ही माहिती भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, शिवसेनेचे रवींद्र माने व महायुतीच्या घटक पक्ष नेत्यांनी आज येथे दिली. ते म्हणाले, ‘‘सभेची जय्यत तयारी करण्यात आली असून, उत्स्फूर्तपणे मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहतील.’’
सभेसाठी उमेदवार धैर्यशील माने आणि कोल्हापूरचे उमेदवार संजय मंडलिक, खासदार धनंजय महाडिक, आमदार प्रकाश आवाडे, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार चंद्रदीप नरके, जनसुराज्यचे विनय कोरे, रयत क्रांती सेनेचे सदाभाऊ खोत, नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर आदी उपस्थित राहणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com