राष्ट्रीय मास्टर्स ॲथलेटिक्स स्पर्धेत कोल्हापूरचे यश

राष्ट्रीय मास्टर्स ॲथलेटिक्स स्पर्धेत कोल्हापूरचे यश

लोगो ः ४३ वी राष्ट्रीय मास्टर्स ॲथलेटिक्स स्पर्धा
.....
कोल्हापूर मास्टर्स ॲथलेटिक्स
असोसिएशनची २८ पदकांची लयलूट

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २ ः मुंबई येथे झालेल्या ४३ व्या राष्ट्रीय मास्टर्स ॲथलेटिक्स स्पर्धेत कोल्हापूर मास्टर्स ॲथलेटिक्स असोसिएशनच्या ज्येष्ठ धावपटूंनी ५ सुवर्ण, ९ रौप्य आणि १४ कांस्य अशी २८ पदकांची लयलूट केली.
विद्याविहार चेंबूर येथील सोमय्या विद्यापीठात झालेल्या स्पर्धेत इतर राज्यांतील स्पर्धकांसह कोल्हापुरातील १६ प्रौढ धावपटूही सहभागी झाले होते. त्यात ४५ वर्षांखालील गटात ८००, १५०० मीटरमध्ये राजेंद्र सावेकर (एक सुवर्ण, कांस्य), नितीन वाघमारे (रौप्य), ५० वर्षांवरील गटात पांडुरंग पाटील यांनी १५०० व ५००० मीटर धावणे स्पर्धेत प्रत्येकी सुवर्ण, तर श्रीकांत आरेकर व बजरंग चव्हाण यांनी ६५ वर्षांवरील गटात ४ बाय १०० रिले व १५०० मीटर धावणेत दोन कांस्यपदके पटकावली.
दिलीप नांगरे यांनी ५ व १० हजार मीटर धावणे स्पर्धेत प्रत्येकी एक कांस्यपदक पटकावले. आकाराम शिंदे यांनी ८० वर्षावरील गटात ८०० मीटर मध्ये रौप्य, तर ३००० मीटर चालणेमध्ये एका कांस्यपदकाची कमाई केली. बंडू माने यांनी याच गटात २०० मीटर धावणेत एक रौप्य, तर ४०० मीटर धावणेत एक कांस्य आणि ३००० मीटर चालणे स्पर्धेत रौप्यपदक मिळवले.
महिलांमध्ये अनिता अथणे यांनी ४० वर्षांवरील गटात २०० मीटर धावणेत व ४ बाय १०० रिलेत प्रत्येकी एक कांस्यपदकाची कमाई केली. विद्या चव्हाण यांनी ५५ वर्षांवरील गटात ४ बाय ४०० रिलेत एक सुवर्ण, १५०० मीटरमध्ये एक कांस्य, ५००० मीटरमध्ये एक रौप्य, ४ बाय १०० रिलेत १ कांस्य अशी पदके मिळवली.
सुषमा परुळेकर यांनी ६५ वर्षांवरील गटात ४०० मीटर व ३००० मीटर चालणे स्पर्धेत प्रत्येकी एक रौप्यपदक मिळवले. डॉ. प्रतिभा खरे यांनी ७५ वर्षावरील गटात लांब उडीत एक सुवर्ण, तर गोळाफेक व थाळीफेकमध्ये प्रत्येकी एक रौप्य आणि १०० मीटर धावणेत एक कांस्यपदक पटकावले. यासह जयसिंग पाटील, सागर चितळे, शिवाजी रुमाले, विष्णू पाटील, सुरेश चौगुले, सतीश पाटील, पांडुरंग चौगुले, रघुनाथ लाड, स्वरूपा गायकवाड यांनी स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. खेळाडूंना असोसिएशनचे अध्यक्ष बाळासाहेब भोगम, उपाध्यक्षा विजयादेवी राणे, सचिव पी. टी. पाटील आदींचे मार्गदर्शन लाभले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com