संजयसिंह पत्रपरीषद

संजयसिंह पत्रपरीषद

ईडीच्या धमकीने भाजपने पक्ष फोडले : संजयसिंह
कोल्हापूर ,ता. १ ः ‘‘देशाची संपत्ती दोस्तावर उधळणाऱ्या मोदी सरकारने ईडीच्या धमकी देत राज्यात दोन पक्ष फोडले. शरद पवारच्या हातातील घड्याळ व ठाकरेंचा धनुष्य बाणाचा मान हिरावला. अशा भाजपला व त्यांच्यासोबत जाणाऱ्या गद्दारांना माफ करू नका, ’’असे आवाहन दिल्लीत आपचे खासदार संजयसिंह यांनी आज येथे केले.
संजयसिंह म्हणाले, ‘‘राजर्षी शाहू महाराजांनी समाजातील दुर्बल घटकांना समाजांच्या मुळ प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण दिले म्हणून त्यांचा आजही देशभरात सन्मान होत आहे. अशा राजांचे दिलेला आरक्षणचा हक्क भाजप हिरावून घेत आहे. राज्यभरात ४०० जागा निवडूण द्या आरक्षण रद्द करतो, संविधान बदलू असे आवाहन भाजपचे नेते करतात. यातून त्यांना हुकुमशाही आणयाची आहे. त्यासाठी ईडी, सीबीआयचा वापर करीत आहेत. त्यांनी दिल्लीत अरविंद केजरीवाल यांना अटक केली त्यांचा तुरूंगात छळच सुरू आहे. पण असे त्यांनी कितीही वेळा तुरूंगात घातले तरी आम्ही कोणी घाबरणार नाही. लोकसभा निवडणूकीच्या प्रचार सुरू आहे यात भाजपनी मागील वेळी दिलेल्या आश्वासनाचे काय झाले याचा हिशेब द्यावा. देशातील ५ टक्के लोकांकडे देशातील साठ टक्के जनतेची संपत्ती आहे. विजय मल्ल्यासारखे अनेकजण कोट्यवधी रुपये घेऊन परागंदा झाले. निवडणूक रोख्यातून भ्रष्टाचार करीत आहेत.’’ यावेळी आपचे संदीप मेहता, जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, शहराध्यक्ष उत्तम पाटील, अजित फाटके पाटील उपस्थित होते.

चौकट
भ्रष्टाचाराचे आरोप असणारेच जोडीला
मोदी सरकारने देशातील अनेक नेत्यावर भ्रष्टाचार आरोप करीत इडी मागे लावली अनेकांना तुरुंगात घातले. ज्यांच्या भ्रष्टाचाराचा आरोप केले इडीची धमकी दिली यात एकनाथ शिंदे, अजित पवार, हसन मुश्रीफ आदींना भाजपने जोडीला घेतले. त्यांच्या साथीने भाजप भ्रष्टाचार निपटून काढण्याची भाषा करते हा विरोधाभास आहे, असेही संजयसिंह यांनी सांगतिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com