गडहिंग्लजला सफाई कामगारांचा सत्कार

गडहिंग्लजला सफाई कामगारांचा सत्कार

gad26.jpg
81038
गडहिंग्लज : पोलिस परेड मैदानावर मल्लिकार्जुन माने यांच्या हस्ते शासकीय ध्वजवंदन झाले. याप्रसंगी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. (छायाचित्र : मज्जिद किल्लेदार, गडहिंग्लज)
----------------------------
गडहिंग्लजला सफाई कामगारांचा सत्कार
महाराष्ट्र, कामगार दिन उत्साहात : शाळा, महाविद्यालयात ध्वजवंदन
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २ : शहर व परिसरात महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा केला. शाळा, महाविद्यालयात ध्वजवंदन केले. सफाई कामगारांचा सत्कार केला. दरम्यान, येथील पोलिस परेड मैदानावर शासकीय कार्यक्रम झाला. प्रांताधिकारी मल्लिकार्जुन माने यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. पोलिस उपअधीक्षक रामदास इंगवले, तहसीलदार ऋषिकेत शेळके, गटविकास अधिकारी शरद मगर, निवासी नायब तहसीलदार विष्णू बुट्टे, महसूल नायब तहसीलदार राजेंद्र यादव, आदी उपस्थित होते. नगरपालिकेत मुख्याधिकारी संजय गायकवाड यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले.

* शिवराज महाविद्यालय
येथील शिवराज महाविद्यालयात कार्यक्रम झाला. संस्थेचे सचिव डॉ. अनिल कुराडे अध्यक्षस्थानी होते. प्राचार्य डॉ. एस. एम. कदम यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. फार्मसीचे प्राचार्य डॉ. राहुल जाधव, डॉ. ए. एम. हसुरे, ग्रंथपाल संदीप कुराडे, पर्यवेक्षक तानाजी चौगुले, आदी उपस्थित होते.

* कोटा ॲकॅडमी
कोटा ॲकॅडमीच्या येथील सेंटरमध्ये कार्यक्रम झाला. अकरावीच्या वर्गाचा प्रारंभ झाला. डॉ. राजश्री पट्टणशेट्टी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत झाले. सुनील गुरव, रमेश राबते, कपिल कांबळे, आदी उपस्थित होते.

* बॅ. नाथ पै विद्यालय
येथील बॅ. नाथ पै विद्यालयात प्रभावती पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. शाळेच्या सफाईचे काम करणारे कलाप्पा तराळ, चेतन वालीकर यांचा सत्कार झाला. शिक्षकांचाही सत्कार झाला. प्रभारी गटशिक्षणाधिकारी नवलकुमार हलबागोळ, विस्तार अधिकारी आर. आर. कोरवी, आदी उपस्थित होते.

* दिनकरराव शिंदे मास्तर विद्यालय
येथील पालिकेच्या दिनकरराव शिंदे मास्तर विद्यालयात कार्यक्रम झाला. अध्यापक मारुती राजमाने यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. मुख्याध्यापक कृष्णा घाटगे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुधाकर धनवडे, उपाध्यक्षा राणी शिंगे, आदी उपस्थित होते.

* क्रिएटिव्ह हायस्कूल
येथील क्रिएटिव्ह हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात संस्थेचे सचिव आण्णासाहेब बेळगुद्री यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. बीडीएस परीक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार झाला. मुख्याध्यापक दिनकर रायकर, सविता बेळगुद्री, एन. जी. सुतार, पी. जे. मोहनगेकर, आदी उपस्थित होते.

* इचलकरंजी महानगरपालिका
इचलकरंजी : आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांच्या हस्ते मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात ध्वजवंदन केले. उपायुक्त प्रसाद काटकर, उपायुक्त स्मृती पाटील, उपायुक्त सोमनाथ आढाव, मुख्य लेखा परीक्षक आरती खोत यांची प्रमुख उपस्थिती होती. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वीप अंतर्गत अधिकारी, कर्मचारी यांनी मतदान प्रतिज्ञा घेतली.

*रोटरी डेफ स्कूल तिळवणी
ध्वजवंदन रोटरीचे अध्यक्ष संतोष पाटील यांच्या हस्ते केले. वार्षिक परीक्षेचा निकाल परीक्षा विभाग प्रमुख अभिनंदन देशमुख व संतोष गांगोडे यांनी जाहीर केला आणि मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण केले. गुणवंत विद्यार्थी म्हणून आयुषकुमार महतो याचा सत्कार केला.

* पोदार इंटरनॅशनल स्कूल
प्राचार्य ईश्वर पाटील यांचे हस्ते ध्वजवंदन झाले. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. शिक्षकांनी राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत झाल्‍यानंतर ध्वजाला, महाराष्ट्राला मानवंदना दिली.

* राजर्षी छत्रपती शाहू हायस्कूल
ध्वजवंदन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश गुंडी यांच्या हस्ते केले. मुलींनी राष्ट्रगीत व राज्य गीत सादर केले. महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण मंडळ केंद्रसंचालक सचिन खराडे यांनी कामगार दिनाचे महत्त्व सांगितले.

* श्री बालाजी विद्यालय
प्रमुख पाहुणे अशोक नाटकुळे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. संस्थेचे संचालक संदीप जाधव, संचालिका सुंदरा जोशी, मुख्याध्यापिका एम. एस. रावळ, उपमुख्याध्यापक डी. वाय. नारायणकर उपस्थित होते.

* तात्यासाहेब मुसळे विद्यालय
महेश सातपुते यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. किरण कोष्टी यांनी महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीचा इतिहास सांगितला. मुख्याध्यापिका व्ही. एन. कांबळे, ए. आर. शेडबाळे, आदी उपस्थित होते.

* कबनूर परिसर
कबनूर : कबनूर व परिसरात महाराष्ट्र दिन व कामगार दिन विविध उपक्रमांद्वारे उत्साहात साजरा केला. कबनूर ग्रामपंचायतच्यावतीने झालेल्या कार्यक्रमात ध्वजपूजन सरपंच शोभा पोवार, ध्वजवंदन ग्रामपंचायत कर्मचारी अण्णाप्पा वडर व लेखनिक सुभाष पोवळे यांच्या हस्ते झाले. माजी सरपंच मधुकर मणेरे, सुधीर पाटील, आदी उपस्थित होते. कबनूर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये झालेल्या महाराष्ट्र दिन व कामगार दिन कार्यक्रमात कबनूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जयकुमार कोले यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. संस्थेच्या संचालिका पार्वती पाटील, महादेव गांजवे, मुख्याध्यापक एस. पी. जाधव, आदी उपस्थित होते. कुसुमताई बाल मंदिर, प्राथमिक विद्या मंदिर, मणेरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या कार्यक्रमात संस्थेचे संस्थापक सुधाकरराव मणेरे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष केटकाळे, समन्वयक अशोक वसगडे, प्राचार्य वैशाली मंगसुळे, आदी उपस्थित होते. हातकणंगले येथील अण्णासाहेब डांगे महाविद्यालय, प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा, आदर्श इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये माजी प्राचार्या डॉ. योजना जुगळे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. संस्थेचे खजिनदार विठ्ठलराव मुसाई, हिराताई मुसाई, प्रभारी प्राचार्य डॉ. निरंजन कुलकर्णी, आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com