पोलिसवृत्त

पोलिसवृत्त

दुचाकींचा धडक; दोघे जखमी
कोल्हापूर ः टाकाळा चौकात दुचाकींची धडक होऊन झालेल्या अपघातात दोघे जखमी झाले. बबलू पांडुरंग लोंढे (वय २३, रा. राजेंद्रनगर) आणि किशोर उत्तमराव नाकट (६५, रा. उचगाव) अशी जखमींची नावे आहेत. दोघे वेगवेळ्या वाहनांवरून प्रवास करीत असताना आज सकाळी आठच्या सुमारास टाकाळा चौकात एकमेकांना धडक होऊन जखमी झाले. त्यांच्यावर ‘सीपीआर’मध्ये उपचार करण्यात आले.
..............
कनाननगरात एकास मारहाण
कोल्हापूर ः कनाननगर परिसरात झालेल्या मारहाणीत संदीप धनाजी कांबळे (वय ३०, रा. नागाळा पार्क) जखमी झाला. बुधवारी सायंकाळी हा प्रकार घडला. जखमीला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.
............
दुभाजकाला धडकून तरुण जखमी
कोल्हापूर ः मंगरायाचीवाडी फाटा (ता. हातकणंगले) येथे मोटारसायकलची रस्ता दुभाजकाला धडक लागून विशाल आवजी जाधव (वय २५, रा. शिरोली) असे जखमीचे नाव आहे. जखमीला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.
------------------
दसरा चौकात तरुणास मारहाण
कोल्हापूर : दसरा चौकात झालेल्या मारहाणीत अंकुश रामचंद्र पोवार (वय ३५, रा. रंकाळा परिसर) जखमी झाला. बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास हा प्रकार घडला. जखमीवर सीपीआर रुग्णालयात उपचार केले. याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.
.................
मारहाणीत ग्राहक जखमी
कोल्हापूर : शिये फाट्यानजीक हॉटेलमध्ये झालेल्या मारहाणीत मिथून काकडे (वय ३२, रा. राजेंद्रनगर) जखमी झाले. मंगळवारी रात्री हा प्रकार घडला. जखमी अवस्थेत त्यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com