मंडलिक अंक

मंडलिक अंक

फोटो- 81120

कोट्यवधींचा निधी देणारे
संजय मंडलिक कृतघ्न कसे?

धनंजय महाडिक ः कळे येथील सभेत केली विचारणा

साळवण, ता. २ ः विरोधी काँग्रेसवाले विकासाबद्दल न बोलता फक्त लोकशाही धोक्यात आहे, संविधान बदलणार, गादीचा मान-अपमान याबाबत अपप्रचार करत आहेत. खासदार संजय मंडलिकांनी या मतदार संघात कोट्यवधींची विकासकामे केली. त्यांनाच ते कृतघ्न कसे म्हणू शकतात? स्वयंघोषित प्रवक्त्यांचे जहाज भरकटले आहे, असा टोला खासदार धनंजय महाडिक यांनी आमदार सतेज पाटील यांना नाव न घेता लगावला.
महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी साळवण, कळे (ता. गगनबावडा) येथे आयोजित प्रचार दौऱ्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पी. जी. शिंदे होते.
महाडिक म्हणाले, ‘कॉंग्रेसने या देशात जवळपास ६८ वर्षे सत्ता भोगली, पण या काळात भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांनी देश पोखरून काढला. मात्र गेल्या दहा वर्षांत मोदी सरकारने भ्रष्टाचाराचा डाग लावला नाही.’
पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, ‘छत्रपतींच्या सन्मानाची भाषा करणाऱ्या कॉंग्रेसवाल्यांनी त्यांना राज्यसभेवर खासदार म्हणून का पाठवले नाही? भावनिक वातावरण तयार करून विरोधक जनतेची दिशाभूल करत आहेत. पंतप्रधान मोदींचे हात बळकट करून देशाला जगात अव्वल बनवण्यासाठी प्रा. मांडलिक यांना विजयी करा.’
प्रा. मंडलिक म्हणाले, ‘मी विकासकामे केलीच नाही म्हणणाऱ्यांना गगनबावडा तालुक्यात मी केंद्र सरकारच्या माध्यमातून दिलेला १६० कोटी रुपयांचा फंड कसा दिसत नाही? मोदींच्या विकसित राष्ट्र संकल्पनेला साथ देण्यासाठी विजयी करावे.’
माजी आमदार चंद्रदीप नरके म्हणाले,‘मोदींसारखे भक्कम, गतिमान विकासाचे नेतृत्व करणारा पंतप्रधान देशाला लाभणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी मंडलिक यांना निवडून द्या.’
‘गोकुळ’चे संचालक अजित नरके यांचे भाषण झाले. ‘राष्ट्रवादी’चे जिल्हाध्यक्ष बाबासो पाटील-आसुर्लेकर, भाजपचे के. एस. चौगले, मेघाराणी जाधव, डॉ. आनंद गुरव, एकनाथ शिंदे, राजवीर नरके, शिवसेना तालुकाप्रमुख तानाजी काटे, दिलीप पाटील उपस्थित होते. प्रास्ताविक व स्वागत स्वप्नील शिंदे यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com