शिवसेना पदाधिकारी बैठक -राजेश क्षीरसागर

शिवसेना पदाधिकारी बैठक -राजेश क्षीरसागर

फोटो -

धनुष्यबाण ‘घर टू घर’ पोचवा

राजेश क्षीरसागर : पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केल्या सूचना

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. २ : ‘‘फक्त विकासकामांवर बोला. पंतप्रधान मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी प्रा. संजय मंडलिक यांच्या पाठीशी राहा. दुसऱ्या विषयावर भाष्य करू नका. महायुतीचे धनुष्यबाण कार्यकर्त्यांनी घर टू घर धनुष्यबाण पोचवा. अडचण आली तर फोन करा. मी २४ तास उपलब्ध आहे,’’ असे आवाहन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केले. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठकीत ते बोलत होते.
‘खिम्याचा कट, धनुष्यबाणावर बोट’ ही ‘स्लोगन’ घेऊन बैठक झाली. या बैठकीत शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक आणि धैर्यशील माने हे निवडून येतील, असा विश्‍वास व्यक्त करून विकासासाठी महायुती कटिबद्ध आहे. शहर व जिल्ह्यातील विकासासाठी महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीशी जनता राहील ही खात्री आहे.’
जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, भाजपचे महानगराध्यक्ष विजय जाधव, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आदिल फरास, शिवसेनेचे महानगरप्रमुख शिवाजी जाधव, शहरप्रमुख रणजीत जाधव, माजी परिवहन सभापती राहुल चव्हाण, माजी नगरसेवक अजित ठाणेकर, महिलाध्यक्ष रुपाराणी निकम, माधुरी नकाते, गायत्री राऊत, दीपाली मोकाशी यांची भाषणे झाली. यावेळी माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, राजू हुंबे, अजित मोरे, अमोल माने, प्रदीप उलपे, सुनील पाटील, विजय खाडे, प्रकाश गवंडी, हेमंत आराध्ये, संगीता खाडे, मंगलताई साळोखे, पूजा भोर, पवित्रा रांगणेकर, गणेश देसाई, विशाल शिराळकर, किरण गवळी, शिवसेनेचे उदय भोसले, रमेश खाडे उपस्थित होते. किशोर घाटगे यांनी सूत्रसंचालन केले.

चौकट
स्वार्थापोटी मराठा समाज दावणीला
राज्यभर मराठा समाजाने आरक्षणासाठी कोणतीच राजकीय भूमिका सोबत घेतली नाही. कोल्हापुरात मात्र व्यक्तिगत स्वार्थापोटी मराठा समाजाला काँग्रेसच्या दावणीला बांधण्याचे काम वसंतराव मुळीक यांनी केले. त्यांनी निवृत्ती घेऊन पुढच्या पिढीला नेतृत्व करण्याची संधी द्यावी. प्रसिद्धीपोटी संपूर्ण समाजास एका राजकीय पक्षाच्या दावणीला बांधत असतील तर त्यांनी त्या पक्षाचे सदस्यत्व स्वीकारून पक्षाचे काम करणे योग्य ठरेल, असा टोला श्री. क्षीरसागर यांनी लगावला. महाराष्ट्र दिनानिमित्त सकल मराठा समाजाचा संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहातील मेळाव्‍याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे, सकल मराठा समाजाचे प्रसन्न शिंदे शिराळकर, संजयसिंह साळोखे, उदय लाड, विक्रमसिंह जरग, विकास सुर्वे, नितीन पन्हाळकर, गीतांजली पाटील, डॉ. पद्मा पाटील, परशुराम पाटील उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com