शांता तांबे यांच्या आत्मकथेचे रविवारी प्रकाशन

शांता तांबे यांच्या आत्मकथेचे रविवारी प्रकाशन

शांता तांबे यांच्या आत्मकथेचे रविवारी प्रकाशन
कोल्हापूर, ता. २ : दिवंगत प्रतिभाशाली अभिनेत्री शांता तांबे यांच्या ‘शांत तारका’ या आत्मकथेचे प्रकाशन रविवारी (ता. ५) होणार आहे. करवीर नगर वाचन मंदिराच्या नवीन सभागृहात सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम होईल. आत्मकथेचे शब्दांकन ज्येष्ठ लेखिका रजनी हिरळीकर यांनी केले आहे. प्रकाशनप्रसंगी चित्रपट निर्माते भास्कर जाधव, ज्येष्ठ पत्रकार उदय कुलकर्णी, संजय पाटील, ज्येष्ठ पत्रकार वासुदेव कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत. शांता तांबे यांच्या हयातीतच या आत्मकथेचे प्रकाशन व्हावे, अशी सर्वांची इच्छा होती. पण तो योग जुळून आला नाही. आता आत्मकथेला पुस्तकरूप आले. राहुल कुलकर्णी व हिरळीकर यांनी पुस्तक प्रकाशन सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com