पवन खेडा पत्रकार परिषद

पवन खेडा पत्रकार परिषद

संविधान बदलासाठीच
‘चारशे पार’चा नारा ः पवन खेडा

कोल्हापूर, ता. २ : ‘अब की बार चारशे पार’चा भाजपचा नारा म्हणजे संविधान बदलण्यासाठीचा डाव असल्याचा आरोप राष्ट्रीय काँग्रेसचे मीडिया व प्रचार विभागाचे प्रमुख पवन खेडा यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला. महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांची चर्चा देशभरात होत असून, चार जूनला आघाडीच्या पहिल्या विजयाची नोंद त्यांच्या रुपाने होईल, असेही ते म्हणाले.
खेडा म्हणाले, ‘‘भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचे संविधानाशी शत्रुत्व आजचे नाही. देशात प्रतीतास दोन युवक आत्महत्या करत असताना भाजप चारशे जागा निवडून देण्याचे आवाहन करत आहेत. बहुमतासाठी २७२ जागा आवश्‍यक असतात. त्यांना चारशेचा आकडा केवळ संविधान बदलण्यासाठी हवा आहे. त्यांच्या प्रचाराला खोट्याचा आधार आहे. नोकरी, महिला सुरक्षा, शेतकरी हितावर भाजपचे नेते बोलत नाहीत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी व मल्लिकार्जुन खर्गे त्यांचा जाहीरनामा मागतात, तेव्हा त्यांना राग येतो. लैंगिक शोषण करणाऱ्यांशी ते हातमिळवणी करत आहेत.’
ते म्हणाले, ‘देश काँग्रेसमुक्त म्हणजे संविधान, संसद व मीडियामुक्त हे लोकांच्या लक्षात आले आहे. याउलट काँग्रेसने कधीच भाजप व आरएसएसमुक्त देश असे म्हटले नाही. आतातर भाजपच काँग्रेसमय झाली आहे, असेही ते म्हणाले.
-----------------------
पवन खेडा म्हणतात...
- निवडणूक आयोगावर पडद्यामागून दबाव असल्याचा संशय
- सूरत व इंदूरमध्ये घडलेला प्रकार म्हणजे लोकशाहीचा पराभव
- शरद पवार यांच्यावर टीका करणे न शोभणारे
- पंतप्रधान मोदींच्या चेहऱ्यावर निराशा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com