फडणवीस प्रेस

फडणवीस प्रेस

शंभर टक्के संभाजीराजेंचा तो अपमानच
देवेंद्र फडणवीस ः राज्यसभा निवडणुकीबाबत ठाकरेंवर टीका
.............
चंदगड, ता. २ ः ‘‘राज्यसभेच्या निवडणुकीत संभाजीराजे छत्रपती यांना अटी व नियम घालून त्यांच्याकडून तसे लिहून घेणे हे चुकीचे आहे. एकीकडे छत्रपती घराण्याविषयी सन्मान दाखवायचा आणि दुसरीकडे असे लिहून घेणे हा शंभर टक्के संभाजीराजे यांचा अपमानच होता,’’ अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला.
श्री. फडणवीस प्रचारासाठी चंदगड येथे आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘लोकांनी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनवण्याचे ठरविले आहे. खासदार संजय मंडलिक यांना खासदार बनविण्याचे जनतेने ठरवले आहे. देशासमोरचे नाही तर त्यांच्या पक्षासमोरचे नरेंद्र मोदी संकट आहेत. अजित पवार आमच्यासोबत आहेत. त्यामुळे नक्कीच शरद पवार यांच्यासमोर नरेंद्र मोदी यांचे संकट आहे. जनता याचे उत्तर मतपेटीतून देईल. राजकारणात पक्ष वेगवेगळे असू शकतात; मात्र अडचणीच्या काळात आजारपणाच्या काळात विचारपूस करणे मदत करणे ही आपली संस्कृती आहे. श्री. मोदी हे नेहमी पाळतात. नरेंद्र मोदी हे त्या काळात नियमितपणे उद्धव ठाकरे यांची फोन करून विचारपूस करत होते.’’
ही लोकसभा निवडणूक देशाची आहे, देशाचे नेतृत्व कोणाकडे द्यायचे हे ठरविणारी निवडणूक आहे. देशाला कोण सुरक्षित ठेवू शकतो. ते आव्हान पेलणारी निवडणूक आहे व हे नेतृत्व करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करणारी निवडणूक आहे. इंडिया आघाडी आणि राहुल गांधी यांच्याकडे २६ पक्षांची खिचडी आहे, असेही श्री. फडणवीस म्हणाले.
इंडिया आघाडीकडे डब्बे नाहीत. प्रत्येकजण स्वतःला इंजिन समजत आहे. श्री. मोदी यांच्या यांच्या इंजिनमध्ये सामान्यांना जागा आहे. विकासाचे इंजिन पंतप्रधान मोदी यांनी जोडले आहे. ६० कोटींपेक्षा जास्त लोक स्वतःच्या पायावर उभे राहिले आहेत. अनेक महिलांना मुद्रा योजनेतून ८० लाख महिलांना लाभ मिळाला. महिलांना स्वतःच्या पायावर उभा करण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले आहे, असेही ते म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com