गडुली सुपर किंग ‘केपीसीएएल’चा मानकरी

गडुली सुपर किंग ‘केपीसीएएल’चा मानकरी

81179
.....
81181
....
81182
.....
81183
.................
गडुली सुपर किंग ‘केपीसीएएल’चा मानकरी

‘गनफायटर्स’ला उपविजेतेपदावर समाधान ः कोल्हापूर पाटीदार सनातन युवक मंडळाचे आयोजन

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २ ः कोल्हापूर पाटीदार सनातन युवक मंडळातर्फे आयोजित केपीसीएल -थ्री जी -बोर्ड कप क्रिकेट स्पर्धेत गडुली सुपर किंग संघाने तुल्यबळ गनफायटर्स संघाचा पराभव करीत विजेतेपदाला गवसणी घातली.
शास्त्रीनगर मैदानावर झालेल्या या अंतिम सामन्यांत गडुली सुपर किंग संघाने प्रथम फलंदाजी करताना १० षटकांत ६ बाद १२२ धावा केल्या. यात रोहित पटेलने २३ चेंडूंत तडाखेबंद फलंदाजी करीत ५२ धावा केल्या. त्यास महेश पटेलनेही १५ चेंडूंत २६ धावा करीत मोलाची साथ दिली, तर हेमांग पटेलनेही उपयोगी खेळी करीत २१ धावांचे योगदान दिले. उत्तरादाखल खेळताना गनफायटर्स संघाला १० षटकांत १०९ धावांपर्यंतच मजल मारता आली. यात विपुल पटेल व योगेश पटेल यांनी प्रत्येकी ३५ धावांचे योगदान दिले, तर अनिल पटेलने १६ धावांची खेळी केली. मात्र, गडुली संघाच्या रोहित पटेल, महेश पटेल, राहुल पटेल यांच्या भेदक गोलंदाजीपुढे त्यांचा टिकाव लागला नाही. त्यामुळे हा सामना जिंकत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
स्पर्धेतील विजेत्या गडुली संघाला दर्शन पटेल, राजेश पटेल, मोहित पटेल आदींच्या हस्ते चषक प्रदान करण्यात आला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष गिरीश पटेल, ईश्‍वर पटेल, शैलेश पटेल, हरेश लिंबाणी, तुलसी पटेल, मुकेश पटेल, मगन पटेल, मनोज पटेल, छगन पटेल, प्रवीण लिंबाणी आदी मान्यवर उपस्थित होते.
.....
उत्कृष्ट खेळाडू..

सामनावीर
रोहित पटेल
....
मालिकावीर
हिरेन पटेल
...
गोलंदाज
विलेस पटेल
......
फलंदाज
कीर्ती पटेल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com