आईच्या खूनप्रकरणी संशयित मुलाला पोलिस कोठडी

आईच्या खूनप्रकरणी संशयित मुलाला पोलिस कोठडी

चाकू, रक्ताने माखलेले कपडे जप्त
आईच्या खूनप्रकरणी मुलाला आज न्यायालयात करणार हजर

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २ ः कौटुंबीक वादातून चाकूने भोसकून आईचा खून करणाऱ्या सादीक राजमहंमद मुजावर (वय ३७, रा. साळोखे पार्क) याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. गुरुवारी पोलिस कोठडीची मुदत संपल्याने शुक्रवारी त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. शहनाज राजमहंमद मुजावर (वय ५५) असे मृत आईचे नाव आहे. मंगळवारी (ता. ३०) रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली होती. पोलिसांनी गुन्ह्यातील चाकू व रक्ताने माखलेले कपडे जप्त केले.
सादीक मुजावर हा टेम्पो चालक आहे. रागीट आणि भांडखोर स्वभावामुळे त्याचे घरच्यांशी वारंवार खडके उडत होते. सात वर्षांपूर्वी लग्न झालेली त्याची पत्नी त्याच्या स्वभावामुळे सोडचिठ्ठी देऊन वेगळी राहते. यानंतर त्याने दोन वर्षांपूर्वी दुसरे लग्न केले होते. पण, या पत्नीसोबतही त्याचा वाद झाला. मंगळवारी रात्री तो पत्नीशी मोबाईलवर बोलत असताना आईने त्याला कोणाशी बोलतोस अशी विचारणा केली. यावर त्याने चिडून गाडीच्या डिक्कीतील चाकूने आईला भोसकले. आईमुळे आमची नवरा, बायकोची भांडणे झालीत असे म्हणत आई शहनाज यांच्या छातीत चाकू भोसकल्याचे फिर्यादी व मयत शहनाज यांची मुलगी रेश्मा मुजावर यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

चौकट
कृत्य करण्यामागील कारणाचा तपास
संशयित आरोपीला मंगळवारी रात्री अटक करण्यात आली. पोलिसांनी केलेल्या चौकशीत हे कृत्य करण्यामागील नेमका कोणता राग होता, कोणाच्या सांगण्यामुळे त्याने कृत्ये केले का याची चौकशी करण्यात येत आहे. त्याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com