मुख्यमंत्र्यांची बाईक रॅली ठरणार आकर्षण

मुख्यमंत्र्यांची बाईक रॅली ठरणार आकर्षण

मुख्यमंत्री शिंदे यांची
बाईक रॅली रविवारी

कोल्हापूर, ता. २ ः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बाईक रॅली रविवारी (ता.५) दसरा चौकातून सकाळी निघणार असून, त्यातून शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. प्रचाराची सांगता होण्यापूर्वीच खुद्द मुख्यमंत्री बुलेटवरून शहरात बाईक रॅली काढणार आहेत. प्रचाराचा एक भाग म्हणून मुख्यमंत्री शिंदे रॅली काढणार आहेत. महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी ही रॅली शहरातील प्रमुख मार्गावरून जाणार आहे. मुख्यमंत्री शिंदे हे शनिवारी (ता.४) कोल्हापुरात दाखल होणार आहेत. तेथे त्यांच्याकडून जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघांतील आढावा घेणार आहेत. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी बाईक रॅलीत सहभागी होतील. याचवेळी मोटारींची ही व्यवस्था केली आहे. त्यामुळे ओपन टप जीपमधूनही मुख्यमंत्री सहभागी होण्याची शक्यता आहे, अशी माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी आज दिली.

...तर वारंवार कोल्हापुरात
यावे लागले नसते
दरम्यान, नागरी कृती समितीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे मुख्यमंत्री तुम्ही राज्याचे आहात की फक्त कोल्हापूरचे मुख्यमंत्री आहात, असा प्रश्‍न उपस्थित केला. मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच, पंचगंगा व रंकाळा प्रदूषण मुक्ती, युवकांसाठी आयटी पार्क, शाहू मिलमध्ये शाहू स्मारक, रखडलेले क्रीडा संकुल या प्रश्‍नांची सोडवणूक केली असती तर ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत वारंवार कोल्हापुरात यावे लागले नसते. तुम्ही बाईक रॅली काढणार आहे, तर आता कळेल, रस्ते किती सुंदर आहेत, असे रमेश मोरे यांनी पत्रकात म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com