शाहू महाराज टुडे

शाहू महाराज टुडे

फोटो- ८११८०

सामाजिक सलोख्याच्या भूमिकेवर
श्रीमंत शाहू छत्रपती महाराज ठाम

डॉ. माणिकराव साळुंखे : विचारवंतांनी घेतली महाराजांची भेट
..............
कोल्हापूर, ता. २ ः गेल्यावर्षी कोल्हापुरात दंगल झाल्यानंतर मी अस्वस्थ झालो होतो. कोल्हापूरची घट्ट सामाजिक वीण उसवली, असे वाटत असताना, सामाजिक सलोखा घडवण्यासाठी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज रस्त्यावर उतरले. घटनेवर नितांत श्रद्धा, लोकशाही मूल्यांशी प्रामाणिकपणा आणि सामाजिक सलोखा या विषयांवर त्यांनी कधीच मत बदलले नाही. त्यातून सामाजिक सलोख्याविषयीची भूमिका ठाम असल्याचे मत शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी व्यक्त केले.
जिल्ह्यातील विचारवंतांनी कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांची भेट घेतली. त्यानंतर डॉ. साळुंखे बोलत होते. ते म्हणाले, ‘कोल्हापुरात दंगल झाल्यानंतर सामाजिक सलोखा राखण्यासाठी शाहू महाराज पुढे सरसावल्यानंतर माझ्यासह विचारवंत, डॉक्टर, वकील, सीए, अशा मंडळींना त्यांच्याविषयी आदरभाव व्यक्त होऊ लागला. शाहू छत्रपती लोकसभेला उमेदवार असल्याने आपण त्यांच्यासोबत आहोत.’
डॉ. जयसिंगराव पवार म्हणाले, ‘देशात धार्मिक ध्रुवीकरण वाढले आहे. निवडणूक आयोगासारख्या स्वायत्त संस्था सत्ताधाऱ्यांच्या बटिक झाल्या आहेत. देशाची वाटचाल एकाधिकशाहीकडे चालली आहे.’
संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड, उद्योजक बाळ पाटणकर, मेघा पानसरे आदींची भाषणे झाली. प्रा. उदय नारकर, विलास पोवार, प्राचार्य व्ही. एम. पाटील, प्रा. शरद नवरे, डॉ. बी. एम. हिर्डेकर, पर्यावरण अभ्यासक उदय गायकवाड, व्यंकाप्पा भोसले, प्रा. एकनाथ काटकर, मंजुश्री पवार, पवन खेबूडकर, हसन देसाई, दुर्ग अभ्यासक भगवान चिले उपस्थित होते.

महाराज संसदेत जाणे अत्यावश्यक
देशात लोकशाही संकटात आली आहे. संविधान बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे. देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे सुरू आहे. अशावेळी शाहू महाराज यांच्यासारखे खासदार दिल्लीत संसदेत असणे अत्यावश्यक आहे, असे मत महात्मा गांधी यांचे पणतू, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तुषार गांधी यांनी व्यक्त केले. शाहू महाराजांची भेट घेतल्यानंतर ते बोलत होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com