जुन्या वाशी नाक्याजवळ गळती

जुन्या वाशी नाक्याजवळ गळती

82619 ( फोटो ओव्हरसेट)
कोल्हापूर : रंकाळ्याजवळील जुना वाशी नाक्याजवळील रस्त्यावर उद्‍भवलेल्या गळतीमुळे रस्ता खराब होत आहे.

जुना वाशी नाक्याजवळ
तीन ठिकाणी गळती

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १० : रंकाळा तलावानजीकच्या रस्त्यावर जुना वाशी नाक्याजवळ तीन विविध ठिकाणच्या गळतीतून पाणी वाहत आहे. रस्त्यावर पाण्याचे प्रवाह असून, तिची दुरुस्ती झालेली नाही.
या परिसरात पूर्वी ड्रेनेज तुंबून त्यातील सांडपाणी रस्त्यावरून वाहत होते. त्यासाठी ड्रेनेज लाईन स्वच्छ करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून जुन्या वाशी नाक्याच्या चौकातून रंकाळा चौपाटीकडे जाणाऱ्या रस्त्यावर तीन ठिकाणी गळती उद्‍भवली आहे. वेगवेगळ्या तीन ठिकाणांहून कमी-अधिक प्रमाणात पाणी रस्त्यावर येत आहे. त्यामुळे त्या रस्त्यावर पाणी साचून खड्डे पडले आहेत. त्याशेजारील दोन गळतींचे प्रमाण कमी आहे, पण तिथेही रस्ता खराब होण्याची शक्यता आहे. रंकाळ्याजवळ असलेल्या या रस्त्यावर उद्‍भवलेल्या गळतीमुळे तिथे फिरण्यास येणाऱ्या नागरिकांना त्रास होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com