‘रवळनाथ’ने जपले सहकारातील चार स्तंभ

‘रवळनाथ’ने जपले सहकारातील चार स्तंभ

GAD93.JPG
82630
कराड : रवळनाथच्या शाखेचे उद्‍घाटन डॉ. ज्ञानेश्वर मुळे व डॉ. पी. एस. पाटील यांच्या हस्ते झाले. एम. एल. चौगुले, डॉ. मोहन राजमाने, डॉ. दत्ता पाटील, डॉ. दीपक पाटील-डांगे, आदी उपस्थित होते.
----------------------------------------------
‘रवळनाथ’ने जपले सहकारातील चार स्तंभ
डॉ. पी. एस. पाटील : कराड शाखेचे उद्‍घाटन उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १० : रवळनाथचे संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले यांनी सहजशीलता, प्रामाणिकपणा या भावनेतून तळमळीने ही संस्था उभी केली आहे. संस्थेने विनम्रता, तप्तरता, पारदर्शकता आणि विश्वासार्हता हे सहकारातील चार स्तंभही जपले आहेत, असे गौरवोद्‍गार शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पी. एस. पाटील यांनी काढले.
श्री रवळनाथ को-ऑप. हौसिंग फायनान्स सोसायटीच्या कराड शाखेच्या उद्‍घाटनप्रसंगी ते बोलत होते. परराष्ट्र मंत्रालयाचे माजी राजदूत डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्या हस्ते उद्‍घाटन झाले. डॉ. अशोक गुजर, सद्‍गुरू गाडगे महाराज कॉलेजचे प्राचार्य डॉ. मोहन राजमाने, संस्थापक-अध्यक्ष एम. एल. चौगुले यांची प्रमुख उपस्थिती होती.
कराड शाखाध्यक्ष प्रा. डॉ. दीपक पाटील-डांगे, सल्लागार प्रा. विलास सुर्वे, प्रा. शिवाजी पाटील, अमरनाथ जोशी, प्रा. हणमंत कुंभार, डॉ. स्वरूपा खामकर, सीमा लाड-देशमुख, शाखा इमारत उभारणीत योगदान दिलेले संतोष सारडा, महेश चौगुले, शाखाधिकारी सुमेध देशपांडे, कराड अर्बन बँकेचे सीईओ दिलीप गुरव यांचा सत्कार झाला. प्रा. डॉ. पाटील-डांगे यांनी स्वागत केले. संस्थापक-अध्यक्ष चौगुले यांनी प्रास्ताविक केले. प्रा. सुर्वे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. खामकर यांनी शुभेच्छा संदेशाचे वाचन केले. प्रा. शिवाजी यांनी आभार मानले.
--
सहकारातील चारित्र्यवान संस्था
व्यवसायाबरोबर सामाजिक बांधिलकी जपणारी रवळनाथ ही सहकारातील चारित्र्यवान संस्था आहे. अशा संस्थेची शाखा कराडमध्ये सुरू होत आहे. हे कराडकरांचे भाग्य असल्याचे डॉ. गुजर यांनी सांगितले. तसेच पुणे-बेंगलोर एक्स्प्रेस महामार्गावर कराड शहर वसले असून, शाखेचे कामही एक्सप्रेस गतीने चालावे, अशी अपेक्षा डॉ. मुळे यांनी व्यक्त केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com