परीक्षा शुल्क परताव्याची प्रतीक्षा

परीक्षा शुल्क परताव्याची प्रतीक्षा

परीक्षा शुल्क परताव्याची प्रतीक्षा
दुष्काळी सवलत : गडहिंग्लजला दहावी, बारावीचे ७१८६ विद्यार्थी
अवधूत पाटील : सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १० : दुष्काळी तालुक्यातील दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याची घोषणा केली. पण, शासन निर्णयास विलंब झाल्याने शाळांनी विद्यार्थ्यांकडून शुल्क भरून घेतले. ते विद्यार्थ्यांना परत दिले जाणार होते. गडहिंग्लज तालुक्यात दहावी व बारावीच्या सात हजार १८६ विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्कापोटी ३१ लाख ३८ हजार ९०० रुपये भरले आहेत. पाच महिने होऊनही या रकमेची त्यांना प्रतीक्षाच आहे.
गतवर्षी पाऊस कमी झाला. त्यामुळे पिकांना फटका बसला. शासनामार्फत पीक परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर राज्यातील १५ जिल्ह्यांतील २४ तालुक्यांत गंभीर, तर १६ तालुक्यांत मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला. मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांत गडहिंग्लजचा समावेश केला. १९७२ नंतर प्रथमच गडहिंग्लज तालुक्यावर दुष्काळी परिस्थिती ओढवली.
दुष्काळ जाहीर झालेल्या ४० तालुक्यांना शासनाने विविध सवलती लागू केल्या. यात जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपांच्या वीज बिलात ३३.५ टक्के सूट यासह शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ केले. शासनाने घोषणा केली. पण, त्याबाबतचा शासन निर्णय वेळेत न झाल्यामुळे शाळा, महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क भरून घेतले. दहावीचे परीक्षा शुल्क ४२० रुपये तर बारावीचे ४५० रुपये होते.
विद्यार्थ्यांनी भरलेले परीक्षा शुल्क शासनाकडून परत दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावरच ती रक्कम जमा केली जाणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांकडून त्यांच्या बँक खात्याची माहितीही घेतली आहे. पण, परीक्षा शुल्क भरून पाच महिन्यांचा आणि बँक खात्याची माहिती घेऊन तीन महिन्यांचा कालावधी उलटला तरी अद्याप विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कापोटी भरलेल्या रकमेची प्रतीक्षाच आहे.
-------------
पिकांची नुकसान भरपाई आली, मग...
दुष्काळी तालुक्यातील खरीप पिकांसाठी शासनाकडून नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. या नुकसान भरपाईची रक्कमही आली आहे. मग, विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क देण्यात विलंब का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. स्वत: भरलेल्या रकमेचीच विद्यार्थ्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे, हे विशेष.
-----------------
दृष्टिक्षेपात आकडे (ग्राफ करणे)
----------------------------
*इयत्ता *विद्यार्थी संख्या *परीक्षा शुल्काची रक्कम
----------------------------
*दहावी *३१६० *१३,२७,२००
*बारावी *४०२६ *१८,११,७००

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com