ताराराणी पक्षाची कार्यकारीणी जाहीर

ताराराणी पक्षाची कार्यकारीणी जाहीर

ताराराणी पक्षाची कार्यकारीणी जाहीर
सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. १० ः ताराराणी पक्षाच्या युवक आघाडीची इचलकरंजी शहर कार्यकारीणी तसेच विद्यार्थी संघटना, ओबीसी सेल व मागासवर्गीय सेल कार्यकारीणी जाहीर केली. नवनियुक्त कार्यकारिणीत विविध भागातील कार्यकर्त्यांना प्रतिनिधीत्व दिले.
नवनियुक्त पदाधिकाऱ्‍यांना जिल्हा परिषद माजी सदस्य राहुल आवाडे यांच्याहस्ते नियुक्ती पत्रे प्रदान करण्यात आली. अध्यक्षस्थानी ताराराणी पक्षाचे अध्यक्ष नाना पाटील होते. आमदार प्रकाश आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडी जाहीर केल्या.
युवक आघाडी इचलकरंजी शहर उपाध्यक्ष - कृष्णा निकम, ओंकार सुर्वे, स्वप्निल कुळवमोडे, रोहन पाटील, खजिनदार - अक्षय बरगे, सचिव - सचिन घाटगे, सरचिटणीस - विनायक आंबिलढोके. युवा विद्यार्थी संघटना इचलकरंजी विधानसभा शहर अध्यक्ष - फहिम पाथरवट, उपाध्यक्ष - निखिल लवटे, युवा विद्यार्थी संघटना डीकेटीई अध्यक्ष - सुयश सुतार, डीकेटीई युवती अध्यक्ष - मिताली अविनाश कांबळे आणि तळंदगे शहराध्यक्ष - तुषार बाणदार. युवा मागासवर्गीय सेल इचलकरंजी विधानसभा अध्यक्ष- सिध्दार्थ कांबळे, उपाध्यक्ष- वैभव कांबळे, कार्याध्यक्ष - विकी कांबळे, ओबीसी सेल इचलकरंजी विधानसभा उपाध्यक्ष - सागर कम्मे, सचिव - अबिद मकानदार.
माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरे, रवि जावळे, राहुल घाट, सुहास कांबळे आदींची भाषणे झाली. ताराराणी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, वैभव हिरवे, दीपक सुर्वे, राजू बोंद्रे, नितेश पोवार आदी उपस्थित होते. सतिश मुळीक यांनी स्वागत केले. तात्यासो कुंभोजे यांनी प्रास्ताविक केले. भारत बोंगार्डे यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com