काजूचा दर वधारला... बाजारात आवक कमीच

काजूचा दर वधारला... बाजारात आवक कमीच

ajr103. jpg
82830
आजरा ः शेतकऱ्यांच्या प्रतीक्षेत काजू व्यापारी. (छायाचित्र ः श्रीकांत देसाई, आजरा)
-------------------------
काजूचा दर वधारला... बाजारात आवक कमीच
आजऱ्यातील चित्र ः चार टन बी जमा, उलाढाल मंदावलेली
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. १० ः येथील आजच्या आठवडी बाजारात काजू बीचा दर १० रुपयाने वाढला आहे. प्रति किलो १०० रुपये दराने व्यापाऱ्यांनी काजू बीची खरेदी केली. चांगल्या व दर्जेदार काजू बीला १०५ रुपये दर मिळाला. हे एकीकडे आशादायक चित्र असताना दुसरीकडे मात्र बाजारात काजूबीची आवक कमीच राहिली. आज कसाबसा चार टन काजू बी जमा झाला. बाजारात काजूची उलाढाल थंडा... थंडा... कुल.. कुल राहिली आहे. आजही काजू उत्पादक शेतकऱ्यांची प्रतीक्षा राहिली.
बाजारात दहा ते बारा काजू व्यापाऱ्यांनी खरेदीसाठी काटे लावले होते. आज दिवसभरात त्यांच्याकडे सुमारे चार टन काजूची आवक झाल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. मे महिन्याचा दुसरा आठवडा आला तरी काजू बीची आवक मंदावलेली आहे. काजू बीचा दर गत आठवड्यात ९० रुपये होता. आज तो १० रुपयांनी वाढला आहे. दर वधारल्यामुळे बाजारात शेतकरी मोठ्या प्रमाणात काजू बी आणतील, अशी अपेक्षा व्यापाऱ्यांना होती; पण हा बाजारही थंडच राहिला. काजू बीची म्हणावी तशी उलाढाल झालेली नाही. काजू उत्पादक शेतकऱ्यांनी याही बाजाराला पाठ फिरवली आहे. पुढील आठवड्यापासून मोठ्या प्रमाणात काजू बीची आवक होईल, अशी आशा व्यापाऱ्यांना आहे.
-----------
पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने काजू उत्पादन यंदा घटले आहे. दर्जेदार काजू बीही मिळत नाही. परदेशी काजूबी आलेली नसल्याने १० ते १५ रुपये दर वाढला आहे. १०० ते १०५ रुपये दर मिळत असून तो ११० रुपयांपर्यंत जाईल, असा अंदाज आहे. आणखीन दर वाढेल, या आशेने शेतकऱ्यांनी माल बाजारात आणलेला नाही. वळवाचा पाऊस काजूला हातभार देईल. पुढील आठवड्यापासून आवक वाढेल.
- देवीदास पाचवडेकर, काजू व्यापारी, आजरा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com