इचल ः पंचगंगा नदी प्रदुषण

इचल ः पंचगंगा नदी प्रदुषण

82842
इचलकरंजी ः पंचगंगा नदी प्रदूषणप्रश्नी पाहणी करताना प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्रीय अधिकारी सचिन हरबड, मत्स्य विकास अधिकारी सतीश खाडे आदी. (अमर चिंदे ः सकाळ छायाचित्रसेवा)
...
पंचगंगा प्रदूषणप्रश्नी इचलकरंजीत
‘प्रदूषण नियंत्रण’कडून पाहणी
दूषित पाणी, मृत मासे यांच्या तपासणीचा देणार अहवाल
इचलकरंजी, ता. १० ः येथील पंचगंगा नदी प्रदूषणामुळे हजारो मासे मृत झाले होते. त्यानंतर आज प्रशासन जागे झाले. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्रीय अधिकारी सचिन हरबड यांनी पंचगंगा घाटावर भेट देऊन पाहणी केली. यावेळी नदीतील दूषित पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले. याशिवाय मत्स्य विकास अधिकारी सतीश खाडे यांनी मृत माशांची पाहणी केली. पुढील तपासणीसाठी मृत मासे घेतले आहेत. दूषित पाणी व मृत मासे यांच्या तपासणीचा अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार आहे.
दरम्यान, धरणांतून पाणी सोडण्यात आल्यामुळे पंचगंगा नदी प्रवाहित झाली आहे. आज सकाळपासूनच नदी खळखळताना दिसत होती. दोन दिवसांत नदी पुन्हा दुथडी वाहताना दिसणार आहे. तर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने तूर्त पाणी उपसा सुरू केलेला नाही. उद्या (शनिवार) पाण्याची तपासणी केली जाणार आहे. त्यानंतरच पाणी उपसा सुरू केला जाणार आहे. याबाबतची माहिती पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली.
येथील पंचगंगा नदीचे पात्र कोरडे पडले होते. तर बंधाऱ्यात साचलेले पाणी दूषित झाले होते. त्यामुळे हजारो मासे मृत झाले होते. कुजण्याची प्रक्रिया सुरू झाल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली होती. सुदैवाने आज धरणांतून पाणी सोडण्यात आले आहे. आज सकाळी हे पाणी इचलकरंजीत पोहचले. त्यामुळे हळूहळू नदीतील पाण्याची पातळी वाढण्यास सुरुवात झाली आहे. पुढील एक - दोन दिवसांत दुथडी नदी वाहताना दिसणार आहे. त्यामुळे नदीकाठावरील गावांना मोठा दिलासा मिळाला आहे. इचलकरंजी महापालिकेने पाच दिवसांपासून पाणी उपसा बंद ठेवला आहे.
...
आयुक्तांची केली पाहणी
पंचगंगा नदी घाटावर घाणीचे साम्राज्य पसरले होते. तर भटक्या कुत्र्यांनी मृत मासे परिसरात टाकले होते. त्यामुळे घाट परिसराला अवकळा आली होती. नागरिकांनीही घाटाकडे पाठ फिरवली होती. मात्र, आज या परिस्थितीची पाहणी महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी केली. त्यांनी घाट परिसरासह मृत माशांची विल्हेवाट लावण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com